योगेश काशीद
बीड : बीड जिल्ह्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसात जिल्ह्यातील सर्व नदी- नाल्यांना मोठा पूर देखील आला होता. यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आणि बीड शहराची त्याचबरोबर शेती तहान भागवणारे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे बीड वासियांची पाण्याची चिंता मिटली आहे.
बीड जिल्ह्यात यावर्षी जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली. या दमदार पावसामुळे बीड जिल्ह्यातील छोटी मोठी धरण फुल्ल झाली असून जिल्ह्यातील महत्त्वाचे धरण बिंदुसरा, माजलगाव आणि मांजरा धरण ओव्हर फ्लो झाले आहेत. मागील आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच भागात मुसळधार पाऊस झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. या पावसामुळे एकीकडे पिकांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.
पाण्याची चिंता मिटली
बीडच्या पाटोदा परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आणि पावसाच्या पाण्याची आवक बिंदूसरा प्रकल्पामध्ये झाली. या पाण्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आता बीड शहराची पिण्याच्या पाण्याची त्याचबरोबर शेती पाण्याची पूर्णपणे चिंता मिटल्याचं समाधान येथील नागरिक व्यक्त करत आहेत. जिल्ह्यातील तिन्ही प्रमुख धरण ओव्हरफ्लो झाले असल्याने धरणाच्या चादरीवरून पाणी पडताना पाहायला मिळत आहेत.
गंगापूर धरणातून पुन्हा विसर्ग
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम पाहण्यास मिळत आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असल्याने धरण ९७ टक्के भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील गंगापूर धरणातून पुन्हा गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ९९० क्यूसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाणी सोडलं जात आहे. परिणामी रामकुंड, गोदाघाट परिसरात गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान गोदा घाटावरील मंदिरांना पुन्हा गोदावरीच्या पाण्याचा वेढा घातला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.