Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : रात्रीच्या सुमारास घराला अचानक आग; घर जळून राख, कुटुंब आले उघड्यावर

Nandurbar News : आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणातच संपूर्ण घर जळून राख झाले. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील नंदलवड येथील एका घराला आग लागल्याने संपूर्ण घर जाळून खाक झाले आहे. तसेच आगीत (Nandurbar) घरातील साहित्य देखील जळाल्याने संसाराची राखरांगोळी झाली आहे. यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. (Maharashtra News)

नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील नंदलवड येथील माज्या सजा वळवी यांच्या घराला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणातच संपूर्ण घर जळून राख झाले. गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आगीत (Fire) घरातील संपूर्ण साहित्य जळून राख झाल्याने माज्या सजा वळवी यांच्या कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट ओढावले असून, उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आगीत संपूर्ण घर आणि घरातील अन्नधान्य, कपडे आणि गृहोपयोगी साहित्य जळून राख झाल्याने माज्या सजा वळवी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जीवितहानी टळली 

रात्रीची वेळ आणि वारा जोरात असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आणि वाऱ्यामुळे आगीचा लोड जवळच गुरासाठी माळा तयार करून ठेवलेला चाऱ्याजवळ पोहचल्याने चारा देखील जळून राख झाला. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर संपूर्ण वळवी कुटुंबीय बाहेर पडले. आगीचे रौद्ररूप पाहून त्यांच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. सर्वच जण घराबाहेर सुखरूप निघाल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यात धाराशिव पंचायत समिती कार्यालयात तुफान राडा

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण, खरेदीची सुवर्णसंधी; वाचा १८- २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Dementia Risk: ३५ ते ४५ वयात ह्रदयविकाराचा झटका आल्यावर वाढतो मेंदूचा आजार? नक्की खरं काय? रिसर्च काय सांगतं?

SCROLL FOR NEXT