Onion Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News: जिल्ह्यात सर्वाधिक कांदा आवक; अधिकृत खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका

जिल्ह्यात सर्वाधिक कांदा आवक; अधिकृत खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : मार्च महिन्यात राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये कांदा अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे राज्यभरातील (farmer) शेतकऱ्यांना दिलासा असताना, नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात कांद्यासाठी अधिकृत बाजारपेठ नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. (Latest Marathi News)

रब्बी हंगामात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक कांदा आवक होत असते. परंतु अधिकृत खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी फेब्रुवारी ते मार्च या काळात कृषी उत्पन्न बाजार समिती, परवानाधारक अथवा नाफेडच्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री केलेल्या कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खरीप आणि रब्बी हंगामात लाल कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटलमागे अनुदान मिळत आहे.

खरेदी केंद्र सुरू करा

नंदुरबार जिल्‍ह्यात कांद्याची आवक अधिक आहे. मात्र नंदुरबारात (Onion) कांदा खरेदी केंद्र नसल्याने शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे कांद्यासाठी अधिकृत खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी आता नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी करू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gajkesri Rajyog: 12 वर्षांनंतर बनतोय गजकेसरी राजयोग; गुरु-चंद्राच्या कृपेने मिळणार

Pitru Paksha: पितृ पक्षात ४ ग्रह बदलणार रास; मेष, मिथुन सह अजून २ राशींचं नशीब फळफळणार

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT