Beed News: आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा; बीडमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा; बीडमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या इंडिक टेल्स आणि हिंदुजा पोस्ट या (Beed) वेबसाईटच्या समाजकंटक असणाऱ्या लेखकांना तात्काळ अटक करा. या मागणीसाठी बीडमध्ये (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे. (Maharashtra News)

Beed News
Jalgaon Accident News: सेवानिवृत्‍तीच्‍या दिवशीच गाठले मृत्‍यूने; सत्‍कारासाठी जाताना घडली दुर्घटना

बीड शहरातील महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांच्या पुतळा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलन केले आहे. या सरकारच्या काळात जाणीवपूर्वक महापुरुषांना बदनाम केले जात आहे. महापुरुषांचे पुतळे बाजूला केले जात आहेत. अगोदर छत्रपती शिवरायांची बदनामी, त्यानंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यासह अनेक महापुरुषांच्या बदनामी या सरकारच्या काळात होत आहे. यामुळे अशा सरकारला समाज त्यांची जागा दाखवेल.

Beed News
Jalna Crime News: तुझ्या नातवाने वाळू का फेकली?; जाब विचारत सख्‍ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून

नुसता गुन्‍हा दाखल नको

मात्र आज आमची एकच मागणी आहे. आज त्या दोन्ही वेबसाईटवर गुन्हा दाखल झाला. मात्र गुन्हा दाखल (Savitribai Phule) करून चालणार नाही. या वेबसाईटवरच्या समाजकंटक असणाऱ्या लेखकांनी हे लेखन केले. त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com