Grampanchayat Election Result Saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election Result: नंदुरबार जिल्ह्याच्या ९ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा; राष्ट्रवादी, काँग्रेसला एकही जागा नाही

Nandurbar News : शहादा तालुक्यातील निवडणूक चुरशीची होणार होती. मात्र अनेक प्रस्थापितांना धक्का देत अपक्षांनी मोठी बाजी मारली

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून नंदुरबार जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींमध्ये ९ ठिकाणी भाजपचा (BJP) झेंडा फडकला आहे. तर ७ ठिकाणी (Nandurbar) अपक्ष निवडून आले आहेत. या निकालामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतच्या (Grampanchayat) मतमोजणी पूर्ण झाली असून शहादा तालुक्यात भाजपाच्या वर्चस्व राहिला आहे. तर दुसरीकडे स्थानिक विकास आघाडीचे देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायती निवडून आल्या आहेत. १६ पैकी भाजपाला ९ ग्रामपंचायतीवर यश आले आहे. तर ७ जागेवर अपक्ष निवडून आले आहेत. शहादा तालुक्यातील निवडणूक चुरशीची होणार होती. मात्र अनेक प्रस्थापितांना धक्का देत अपक्षांनी मोठी बाजी मारली असल्याचे दिसून येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकताच पालकमंत्री पद मिळालेल्या (NCP) राष्ट्रवादीच्या अनिल भाईदास पाटील यांना या निवडणुकीत मोठा धक्का मानला जात असून, शहादा तालुक्यातील १६  पैकी एकही ग्रामपंचायत राष्ट्रवादीची निवडून आलेली नाही. तर तीच परिस्थिती काँग्रेसची देखील झाले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासाठी देखील या निवडणुका प्रतिष्ठेच्या होत्या. परंतु, भाजपाचे स्थानिक अंतर्गत वादामुळे डॉ. विजयकुमार गावित यांच्या गटाला कमी ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तर आमदार राजेश पाटील यांना चांगल्या ग्रामपंचायती मिळून आल्या असल्याने शहादा तालुक्यात भाजपाचे वर्चस्व राहिला असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुठे ऊन तर, कुठे पावसाचा कमबॅक; कुठल्या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम? पाहा Weather Report

Success Story: आधी डॉक्टर मग IAS; पालघरच्या निर्भीड अन् कडक शिस्तीच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड आहेत तरी कोण?

Shukra Shani Yuti: दिवाळीपूर्वी शनी-शुक्र बनवणार दुर्मिळ संयोग; करियर आणि बिझनेसमध्ये होणार लाभ

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

SCROLL FOR NEXT