सागर निकवाडे
नंदूरबार : धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भंगार अवैधरित्या गांजाची शेती केली जात असल्याचे समोर आले आहे. यात (Nandurbar) अनेकजण शेतात लावलेल्या पिकांच्या आडून गांजा लागवड करत असतात. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्याच्या शेतातच गांजाची लागवड करण्यात आल्याचे (Shahada) शहादा तालुक्यातील नवागाव येथे उघडकीस आले आहे. (Tajya Batmya)
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शेतात लागवड केलेली जवळपास १ कोटी रुपयांचा गांजा पोलिसांनी (Police) उध्वस्त केल्याची कारवाई आज करण्यात आली आहे. यानंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवागाव येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्याने केळीच्या बागेत गांजाची शेती होत असल्याची गोपनीय माहिती बातमीदाराने पोलिसांना दिली. या माहितीवरून शहादा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार पथकाने शेतात अचानक धाड टाकली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
१७ लाखाचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी धड टाकत केलेल्या कारवाईत २५३ किलो १८ ग्रॅम वजनाचे गांजा मिळून आला. बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत १७ लाख ७४ हजार ६६२ रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात सुनील चव्हाण यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे जिल्ह्यात अमली पदार्थ मुक्ताच्या गोष्टी करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाईमुळं नंदुरबार जिल्ह्यात खरंच आमले पदार्थ मुक्त जिल्हा आहे का असा काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.