Kalyan Crime News: वडिलांच्या हत्येनंतर मुलाला जीवे मारण्याची धमकी; मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल

Kalyan News : हत्येच्या प्रकरणात दोन आरोपीना बेड्या ठोकल्या असून विजय पाटील व नितीन पाटील हे दोघे सध्या शिक्षा भोगत आहेत
Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv
Published On

अभिजित देशमुख 
कल्याण
: वडिलांची हत्या केल्याने मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. ही तक्रार दाखल केल्यानंतर मुलाला देखील जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार (Kalyan) कल्याण येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसात (Manpada Police) तक्रार दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

Kalyan Crime News
Bribe Trap : २ हजारांची लाच घेताना मंडल अधिकारी अडकला; ACB ने असा रचला होता सापळा!

कल्याण ग्रामीण परिसरातील हेदूटणे गावात पाण्याच्या टँकर व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या संतोष सरकटे या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यापूर्वी घडली होती. मात्र या प्रकरणी संतोष यांची हत्या (Crime News) झाल्याचा संशय असल्याने कुटुंबाने याप्रकरणी चौकशीची मागणी करत संतोष सरकटे यांचा मुलगा सागरने पोलिसात (Police) तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मानपाडा पोलीस ठाणेनंतर कल्याण क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता. डोंबिवलीचे एसीपी सुनील कुराडे यांच्या पथकाने घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा करत याप्रकरणी विजय पाटील आणि नितीन पाटील या दोन आरोपीना बेड्या ठोकल्या होत्या. विजय पाटील व नितीन पाटील हे दोघे सध्या शिक्षा भोगत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime News
Pimpri Chinchwad News: मनाई असताना शहरातून अवजड वाहतूक; १५ दिवसात ६ हजार वाहनांवर कारवाई

रात्री रस्त्यावर गाठत दिली धमकी 

दरम्यान २ नोव्हेम्बरला रात्रीच्या सुमारास सागर सरकटे दुचाकीने कल्याण शीळ रोडहुन जात होता. यावेळी पाठीमागून दुचाकीवर दोन जण आले होते. त्यांनी सागरला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर सागरला शिविगाळ करत तू नितीन व विजय यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घे, तुला परत सांगणार नाही आज नाही उद्या ते बाहेर येतील; तेव्हा तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना मारू अशी धमकी दिली. या घटनेमुळे सागर दहशतीमध्ये आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी त्याने केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com