Kalyan Crime News
Kalyan Crime NewsSaam tv

Kalyan Crime News : भांडणानंतर बायको आणि मुलाला आणायला सासरवाडीला गेला; जावई सासूलाच घेऊन गेला

Kalyan News : बायकोसह मुलाला आणायला गेला; पत्नी भेटली नाही म्हणून केले भलतेच कृत्य
Published on

अभिजित देशमुख 

कल्याण : पतीसोबत भांडण झाल्यानंतर माहेरी गेलेल्या बायकोला मुलासह पती आणायला गेला. मात्र बायको भेटली नाही, म्हणून तरुणाने सासूचेच अपहरण करत तळोजा परिसरात डांबून ठेवले. इतकेच नव्हे तर (Crime News) रागाच्या भरात सासूला लोखंडी रॉड व कैचीने मारहाण केल्याची घटना (Kalyan) कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. 

या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जावई भावेश मढवी व त्याचा मित्र सूरज म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. (Tajya Batmya)

Kalyan Crime News
Bachchu Kadu News: सरकार सकारात्मक, टोकाची भूमिका नको; उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू शिंदखेडा राजाकडे रवाना

नवी मुंबई तळोजा परिसरात भावेश मढवी हा त्याची पत्नी दिक्षिता व मुलासोबत राहतो. गेल्या काही महिन्यांपासून भावेश व दक्षतामध्ये वाद होत होते. रोजच्या भांडणाला कंटाळून दिक्षिता मुलाला घेऊन कल्याण पूर्वेकडील मलंग रोड अमरदीप कॉलनी येथे माहेरी आली होती.

संतापलेल्या भावेशने त्याचा मित्र सूरज म्हात्रे याला घेत अमरदीप कॉलनी गाठली. घरात आल्यानंतर सासू दीपाली खोकरे हिला माझी बायको कुठे आहे. माझ्या मुलाला कुठे विकले असे विचारत सासूशी वाद घालण्यास सुरुवात केली. दीपाली यांना चाकूचा धाक दाखवत भावेश व सूरज यांनी पोलिस (Police) ठाण्यात नेण्याच्या बहाण्याने जबदरदस्तीने गाडीत बसवत नवी मुंबई तळोजा येथील आपल्या घरात डांबून ठेवले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime News
Dhule News : शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

पत्नी फोन करून धमकावले 

भावेश व सुरज या दोघांनी दिपाली यांना लोखंडी रोड व कैचीने मारहाण केली. या दरम्यान भावेशने पत्नीला फोन करून मुलाला आणून दे, तुझी आई माझ्या ताब्यात असल्याचे सांगितले. 

दिक्षिताने याप्रकरणी मानपाडा पोलीस (Manpada Police) ठाण्यात भावेश मडवी व सूरज मात्रे या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी जावई भावेश मडवी व त्याचा मित्र सुरज म्हात्रे या दोघांनाही अटक करत पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना उघडगी झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी ज्ञानोबा सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com