Bachchu Kadu News: सरकार सकारात्मक, टोकाची भूमिका नको; उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू शिंदखेडा राजाकडे रवाना

Amravati News : सरकार सकारात्मक, टोकाची भूमिका नको; उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू शिंदखेडा राजाकडे रवाना
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : गेल्या सात दिवसापासून अंतरवाडी सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा रणसिंग फुंकले (Amravati) असून आता ही आरपारची लढाई आहे असे सांगत पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आज मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे रक्तदान करून पाठिंबा देण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले आहेत. (Latest Marathi News)

Bachchu Kadu
Dharashiv News: धाराशिवमधली संचारबंदी हटविली, जमावबंदी कायम; बीडमध्येही नियम शिथिल

गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाच (Maratha Aarkshan) आंदोलन हे उग्र रूप घेत असून अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड पाहायला मिळाली. तर अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालय व गाड्या जाळल्याचा प्रकारही घडला. तर काही गावांमध्ये राजकीय लोकांना गावबंदी सुद्धा करण्यात आली. मात्र आंदोलनाला वेगळे वळण देऊ नये. आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून मराठा समाजाने टोकाची भूमिका घेऊ नये. मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारला वेळ द्यावा. कारण त्यांची प्रकृती चांगली राहिली तर आंदोलन अधिक मजबूत होईल; असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांची प्रकृती चांगली रहावी यासाठी आंदोलनाला पाठिंबा म्हणून रक्तदान करण्यासाठी जात असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bachchu Kadu
Sangli News : मराठा आरक्षणासाठी केला होमहवन; आंदोलकांकडून देवाला साकडे

दोन दिवसाआधी जरांगे पाटलांनी उपोषण दरम्यान पाणी प्यावं आणि त्यांच्या लढ्याला आम्ही पाठिंबा देत आहोत, असं सांगितल्यानंतर थेट जरांगे पाटलांनी अंतरवाडी सराटी येथून आमदार बच्चू कडू यांचे आभार मानले होते. मात्र आज आम्ही रक्त सांडून नाहीतर रक्त देऊन या आंदोलनाला पाठिंबा देऊ असं सांगत थेट बच्चू कडू यांनी या आंदोलनाच्या पाठिंबासाठी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.  शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार बच्चू कडू मतदारसंघातून शिंदखेड राजाकडे निघाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com