ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरू असून निकालांचे प्राथामिक कल हाती येत आहेत. राज्यातील अनेक ग्रामपंचातींवर अजित पवार गट आणि भाजपने विजय मिळवला आहे. दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसने देखील महत्वाच्या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली आहे. अशातच पंढरपूरमध्ये भाजप आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. माळशिरजमध्ये ३० वर्षांनंतर सत्तांतर झालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
माळशिरज ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या नंदा नामदास या सरपंचपदी निवडणूक आलेल्या आहेत. गेल्या ३० वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीने भाजपचा गड उध्वस्त केला असून एकहाती सत्ता मिळवली आहे. आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दुसरीकडे बुलढाण्यात भाजप आमदार संजय कुटे यांना होमग्राऊंडवर मोठा धक्का बसला आहे. जामोद ग्रामपंचायतीवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. काँग्रेस पॅनलच्या उमेदवार गंगुबाई दामधर सरपंचपदी निवडून आल्या आहेत. तर भाजपच्या उमेदवार अर्जना राऊत पराभूत झाल्या आहेत. त्यामुळे जामोदमध्ये काँग्रेसची ताकद वाढली असून भाजपचं टेन्शन वाढलं आहे.
शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. खवासपूर ग्रामपंचायत शहाजीबापूंच्या हातातून गेली आहे. या ग्रामपंचायतीवर शेकापने सत्ता मिळवली आहे. शेकापचे संजय दिक्षीत सरपंचपदी निवडून आले आहेत. शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या रांजणगाव ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. या ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाने विजय मिळवला आहे. शरद पवार गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.