Lok Sabha Election Saam tv
महाराष्ट्र

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त २८५ कर्मचाऱ्यांची ट्रेनिंगला दांडी; गैरहजर कर्मचाऱ्यांना बजावणार नोटिस

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा मतदार संघनिहाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची देखील तयारी सुरु आहे. निवडणुकीसाठी प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिले जात आहे. मात्र (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी २८५ कर्मचारी हे गैरहजर राहिले. यामुळे या कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविण्यात येणार आहे. (Breaking Marathi News)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा मतदार संघनिहाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. दोन्ही दिवसांच्या दोन्ही सत्रांत ईव्हीएम मशीनबाबत पी.पी.टी. दाखवण्यात आली. त्यात मतदान यंत्र कसे सेटिंग व सीलिंग करावे, याबाबत माहिती निवडणूक (Election) कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक देण्यात आली. तसेच मतदानाच्या दिवशी आवश्यक ते फॉर्म कसे भरावेत त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याच वेळी निम्म्या प्रशिक्षणार्थ्यांना इव्हीएमचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण घेण्यात आले. दोन्ही दिवस मिळून तब्बल २८५ कर्मचारी गैरहजर राहिले. या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. या कर्मचाऱ्यांना या नोटिसीचे उत्तर द्यायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT