Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : गुजरातला जाणारा ३ लाख १८ हजाराचा दारूसाठा जप्त; शेतात धाड टाकून पोलिसांची कारवाई

Nandurbar News : आमलीफळी, तिनटेंबा या गावातील हरीश मावची याचे शेतातील झोपडीत अवैधरित्या देशी दारूचा साठा करून ठेवला आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : महाराष्ट्र राज्यातून गुजरात जाणारा दारूचा अवैध साठा नवापूर पोलिसांनी जप्त केला आहे. शेतात लपवून ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. यात सुमारे देशी दारूचे ५० बॉक्स पोलिसांना आढळून आले आहेत. 

नवापूर (Navapur) पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार आमलीफळी, तिनटेंबा या गावातील हरीश मावची याचे शेतातील झोपडीत अवैधरित्या देशी दारूचा साठा करून ठेवला आहे. तेथून गुजरात राज्यात विक्री करिता घेवून जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार नवापूर पोलीस (Police) पथकाने सुमारास छापा टाकून पाहणी केली असता सदर ठिकाणी २ मोटरसायकलसह मेहुल राकेश नायका (रा. तिनटेबा, ता. नवापूर) व अतुल मुंगा गामित (रा. पटेल फळीया, उच्छल, गुजरात) हे संशयित मिळून आले. 

पोलिसांनी त्यांना (Nandurbar) विचारपूस केली असता शेतातील झोपडीची झडती घेत देशी दारूचे ५० बॉक्स मिळून आले. सदर देशी दारू बॉक्सबाबत त्यांचेकडे विचारपूस करता सदर मुद्देमाल दोघांसह आकाश मावची (रा. आमलिफळी, तिनतेंबा, ता नवापूर) व सुरेंद्र उर्फ सुंदर यांनी मिळून आणलेबाबत त्यांनी सांगितले. त्यानुसार नवापूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच सदर गुन्ह्यात ३ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

SCROLL FOR NEXT