Latur Bribe Case : शेतकऱ्याकडून घेतली लाच; पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Latur News : शेतातील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी शेतकऱ्याकडून २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी
Latur Bribe Case
Latur Bribe CaseSaam tv

संदीप भोसले 

लातूर : शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना शेतकरी कसेतरी शेतीचा खर्च काढून आपला संसाराचा गाडा ओढत असतो. मात्र शेतकऱ्याकडून देखील पैशांची मागणी करत सदरची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकासह हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. 

Latur Bribe Case
Lightning Strike : वीज पडून १२ मेंढ्यांचा मृत्यू; माजलगाव तालुक्यातील घटना

लातूर (Latur) जिल्ह्यात हि खडबडजनक घटना घडली आहे. सदर घटनेत शेतातील झाड तोडण्याच्या कारणावरून भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी शेतकऱ्याकडून २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे यांनी केली होती. मात्र तक्रारदार (Farmer) शेतकऱ्याने याबाबत लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा करून पथक नेमून सापळा रचण्यात आला. 

Latur Bribe Case
Pandharpur Rain : पंढरपुरात मुसळधार; एका रात्रीत विक्रमी १३१ मिली मीटर पाऊस, सरगम चौकातील वाहतूक रात्रीपासून बंद, पहा व्हिडीओ

दरम्यान ठरल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोरे व सह पोलीस हवालदार पांडुरंग दाडगे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडून २० हजाराची लाचेची (Bribe) रक्कम स्वीकारली. याचवेळी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले आहे. या दोघांनाही आता एसीबीने अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com