Lightning Strike : वीज पडून १२ मेंढ्यांचा मृत्यू; माजलगाव तालुक्यातील घटना

Beed News : राज्यातील अनेक भागात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले
Lightning Strike
Lightning StrikeSaam tv

बीड : राज्यातील अनेक भागात गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात बीडच्या माजलगाव तालुक्यातील हिवरा गावामध्ये वीज पडून तब्बल १२ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे मेंढीपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. 

Lightning Strike
Buldhana News : लोंबकळलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन जोरदार झटका; शेतात कामासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

राज्यातील अनेक भागात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात सायंकाळच्या सुमारास वादळी वारा व (Lightning Strike) विजांच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले. मात्र पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला असून आता पेरणीच्या तयारीला लागला आहे. तरी देखील आणखी दमदार पाऊस पडण्याची प्रतीक्षा आहे. 

Lightning Strike
Parbhani Bribe case : सही शिक्क्यासाठी लाच; ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या ताब्यात

रात्रीच्या वेळी अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार (Rain) पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. तर हिवरा गावातील मेंढपाळ रामकिसन टकले यांच्या गाव परिसरात असलेल्या मेंढ्यांच्या (Beed) कळपालगत वीज पडल्याने तब्बल १२ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. यामुळं टकले यांचे जवळपास २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com