Pandharpur Rain : पंढरपुरात मुसळधार; एका रात्रीत विक्रमी १३१ मिली मीटर पाऊस, सरगम चौकातील वाहतूक रात्रीपासून बंद, पहा व्हिडीओ

Pandharpur News : रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या जोडीवर मागील अनेक वर्षानंतर रात्री पंढरपूर व परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे
Pandharpur Rain
Pandharpur RainSaam tv

पंढरपूर : पंढरपूर शहर व परिसरात रात्री मुसळधार पाउस झाला. पंढरपुरात एका रात्रीत विक्रमी १३१ तर तालुक्यात ५२३ मिली मीटर इतका पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे काहींच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर रस्त्यावर देखील गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. यात पंढरपुरातील सरगम चौकातील वाहतूक रात्रीपासून बंद आहे. 

Pandharpur Rain
Lightning Strike : वीज पडून १२ मेंढ्यांचा मृत्यू; माजलगाव तालुक्यातील घटना

पंढरपूर (Pandharpur) शहरात मागील अनेक वर्षानंतर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या जोडीवर मागील अनेक वर्षानंतर रात्री पंढरपूर व परिसरात मुसळधार पाऊस (Rain) झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता. मुसळधार पावसामुळे ओढे, नाले भरून‌ वाहू लागले आहेत. तर शहरातील रस्ते देखील पाण्याखाली गेले होते. यामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तर काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. 

Pandharpur Rain
Parbhani Bribe case : सही शिक्क्यासाठी लाच; ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या ताब्यात

रात्रीपासून सरगम चौकातील वाहतूक बंद
पंढरपुरात मुसळधार झालेल्या पावसाने (Heavy Rain) दाणादाण उडाली आहे. सखल भागातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे; तर शहरातील रेल्वे पुलाखाली साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अवघ्या तीन तासामध्ये तब्बल ५३१ मिली मीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे रात्रीपासून सरगम चौकातील रस्ता बंद आहे. आज सकाळी पूलाखाली पाण्यात बस अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com