Crime News In Parbhani Saam TV
महाराष्ट्र

Crime News In Parbhani : संतापजनक! नांदेड-पुणे एक्सप्रेसमध्ये दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; धक्कादायक घटनेचा Video

साम टिव्ही ब्युरो

राजेश काटकर

Parbhani News : वातानुकूलित रेल्वे डब्यात बसलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका माजी नगरसेवकाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना परभणी येथून समोर आली आहे. 9 एप्रिल रोजी नांदेड-पुणे एक्सप्रेस रेल्वेमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी 18 एप्रिल रोजी नांदेड रेल्वे पोलिसात नगरसेवकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Nanded to Pune Express)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नांदेड येथील 22 वर्षीय दोन विद्यार्थी पुणे येथे जाण्यासाठी पुणे एक्सप्रेस रेल्वेत बसले होते. यातील एक जण बी1 आणि दुसरा बी३ डब्यात होता. नांदेड ते पूर्णा दरम्यान रेल्वेत असताना परभणीचा माजी नगरसेवक प्रशांत उर्फ बबलू केशवराव नागरे हा बी3 डब्ब्यात आला.

यावेळी त्याची व विद्यार्थ्यांची जागेवरून कुरबुर झाली. त्यावेळी नागरे याने विद्यार्थ्यांला जबर मारहाण केली. 'एक बच्चे को उठाणा है' असे तो आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीशी बोलत होता, असे विद्यार्थ्याने सांगितले.

दरम्यान, ही घटना मुलाने त्याच्या पालकांना कळवली. पालकांनी परभणी पोलिसांना कळवले. परभणी पोलिसांनी पूर्णा पोलिसांना घटनेची माहिती दिली. रेल्वे येताच पूर्णा पोलिसांनी आरोपी बबलू याला डब्याखाली उतरवून त्याची कानउघडणी केली. तथापि,पूर्णाहून गाडी निघताच बबलू पुन्हा बी3 डबाब्यात चढला आणि 'तू पोलिसांना बोलावतोस का? असे म्हणून पुन्हा त्या विद्यार्थ्यांला मारहाण केली.

यावेळी घाबरलेला सदर विद्यार्थी (Student) बी1 मधील त्याच्या मित्राजवळ जाऊन बसला, तेथेही नागरेने त्याला सोडले नाही. तो तेथे पोहोचला व त्याने विद्यार्थ्याला लाथा बुक्क्यांने मारहाण सुरू केली. यावेळी उपस्थित दुसऱ्या विद्यार्थ्यांला 'हा कोण लागतो रे तुझा?' अशी विचारणा नागरेने केली.'तो माझा मित्र आहे' असे उत्तर मिळताच नागरेने त्यालाही लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. "काका, मला का मारता मी काय केलं" अशा शब्दांत विनंतीपूर्वक विद्यार्थी बोलत असताना नागरे त्याला मारतच होता.

त्याने विद्यार्थ्यांच्या छातीत लाथा मारल्या. त्याचे डोके आपटले. कपाळावर मार लागला. डोके आपटल्याने डोक्याच्या मागील बाजूस वेदना झाल्या. परभणीला गाडी येताच नागरे उतरून निघून गेला.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पुणे येथे पोहोचताच विद्यार्थ्यांनी खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. मारहाणीमुळे दोन्ही विद्यार्थी घाबरले होते,तर कोणालाही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

त्यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी पालकांनी त्यांची समजूत काढली 18 एप्रिल रोजी या घटनेची तक्रार नांदेड रेल्वे पोलिसात देण्यात आली. बबलू नागरेविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक संतोष उनऊने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT