nanded crime news Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Crime News : पाणीपुरी नव्हे ताे निघाला गावठी कट्टा विक्रेता, मध्यप्रदेशाच्या युवकास अटक

मागील काही दिवसांपासून तो भोकर मध्ये राहत होता.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News : पाणीपुरी व्यवसायाच्या नावाखाली गावठी कट्टे विक्री करणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील एका युवकाला शिवाजीनगर पोलीसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस देखील जप्त केली आहेत. (Maharashtra News)

संजय परिहार असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ताे मध्यप्रदेश राज्यातील बिल्हेटी येथील रहिवासी आहे. मागील काही दिवसांपासून तो (nanded) भोकर मध्ये राहत होता. तिथे तो पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करायचा.

नवीन मोंढा परिसरात गावठी कट्टे आणि काडतूस विक्री करत असल्याची माहिती डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांना मिळाली. त्यानंतर पोलीसांनी त्या युवकास ताब्यात घेतले. झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस आढळून आले.

संशयित पाणीपुरी व्यवसायाखाली मध्यप्रदेशहुन गावठी कट्टे आणायचा. नांदेडमध्ये त्याची विक्री करायचा. यापूर्वी देखील स्थानिक गुन्हे शाखेने अशा प्रकारे कारवाई केली होती. यामागे मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कट्टे खरेदी करणाऱ्यांचा पोलीस घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ८व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी

Maharashtra Live News Update: जळगावमध्ये भरधाव बस टोलनाक्याच्या भिंतीवर धडकली, एकाचा मृत्यू

Lung Cancer Symptoms: फुफ्फुसांचा कॅन्सर होण्यापूर्वी हाता-पायांवर दिसतात ७ मोठे बदल, वेळीच लक्षणं ओळखा

Plane Crash : विमान थेट शाळेवर कोसळलं, १२ जणांचा मृत्यू, केनिया दु:खात बुडाले

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा दणका; 20 शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT