marigold flowers
marigold flowerssaam tv

Ganesh Festival 2023 : गौरी गणपतीमुळे फुलांचा भाव वधारला, झेंडूसह शाेभिवंत फुले शंभरी पार

गुलाब, झेंडू, अष्टर, मोगरा आदी फुलांचे भाव‌ वाढले आहेत.
Published on

मंगेश कचरे / भारत नागणे / अमर घटारे

Ganpati Festival 2023 : राज्यभरात गणेशाेत्सव माेठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणपती-गाैरी निमित्त राज्यातील विविध भागात फुलांच्या दरात माेठी वाढ झाली आहे. झेंडू फुलांसह शाेभिवंत फुलांना देखील मागणी असल्याने फुलांच्या दर शंभरी पार झाला आहे. (Maharashtra News)

marigold flowers
'सीएम महाराष्ट्रात कुठूनही निवडून येतील', आदित्य ठाकरेंच्या 'ओपन चॅलेंज' वर एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांला विश्वास

बारामती तालुक्यातील झारगडवाडी, डोरलेवाडी, काटेवाडी,सोनगाव या भागातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात झेंडू या फुलांची ठिबक, मल्चिंग आदीचा वापर आधुनिक पद्धतीने लागवड करतात.

गेल्या दोन दिवसांपासुन बाजारामध्ये उत्सवामुळे झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गणेशोत्सवामुळे बाजारात झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्यामुळे झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

marigold flowers
Dharashiv News : सर्व प्रकल्पातील पाणी पिण्याकरिता आरक्षित : धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

बारामतीत झेंडूला मिळताेय दर

यामुळे मात्र झेंडू फुले उत्पादन शेतकरी वर्गाल दिलासा मिळाला आहे. किरकाेळ खरेदीदारांकडून झेंडूच्या फुलांची मोठी मागणी होत आहे. मागील एक महिना झेंडूच्या फुलांना भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र आता झेंडूला 50 ते 60 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे. यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पंढरपूरात फुलांच्या हाराची जोडी महागली

गौरी गणपती सणानिमित्ताने पंढरपूरच्या बाजारपेठेत विविध फुलांच्या हारांना मोठी मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने फुलांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फुलांच्या हाराची जोडी तीनशे रुपये पासून हजार रुपये पर्यंत विकली जात आहे. राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे गुलाब, झेंडू, अष्टर, मोगरा आदी फुलांचे भाव‌ वाढले आहेत.

अमरावतीत गुलाबाचा भाव वधारला

अमरावतीत फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र फुलांचे भाव हे गगनाला भिडलेत. काही दिवसाआधी झेंडूचे फुले हे चाळीस रुपये किलो होती आता झेंडूचे फुल 100 ते 120 रुपये किलो, गुलाब 300 ते 350 रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे. या दरवाढीचा फायदा मात्र शेतकऱ्यांना होताना दिसून येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

marigold flowers
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ६ दिवसांची परवानगी, वाचा जिल्हाधिका-यांचा नवा आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com