Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी ६ दिवसांची परवानगी, वाचा जिल्हाधिका-यांचा नवा आदेश

यापूर्वी गणेशोत्सवाकरीता ५ दिवस निश्चित करण्यात आले होते.
pune, ganeshotsav 2023, ganpati festival 2023, ganesh festival 2023
pune, ganeshotsav 2023, ganpati festival 2023, ganesh festival 2023saam tv
Published On

- सचिन जाधव

Pune Ganpati Utsav : पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान ५ ऐवजी ६ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. (Maharashtra News)

pune, ganeshotsav 2023, ganpati festival 2023, ganesh festival 2023
Aditya Thackeray In Kokan : तुमचं आमचं नव्हे हे गद्दार, गँगस्टर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरांचे सरकार : आदित्य ठाकरे

केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ अन्वये सण उत्सव कालावधीसाठी १५ दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाच्या वापरासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारी २०२३ च्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सन २०२३ च्या सण उत्सवांकरिता १३ दिवस निश्चित करुन २ दिवस राखीव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये गणेशोत्सवाकरीता ५ दिवस निश्चित करण्यात आले होते.

pune, ganeshotsav 2023, ganpati festival 2023, ganesh festival 2023
Crime News : तिहेरी हत्याकांडाने नगर जिल्हा हादरला, पत्नी, मेहुण्यासह आजे सासूचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

विविध लोकप्रतीनिधी व गणपती मंडळे यांनी पुणे शहरात आणि जिल्ह्यात सार्वजनिक गणपती (ganpati) उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन केले जात असल्याने ते दिवसही विशेष बाब म्हणून वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती.त्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनीही परवानगी देण्यात हरकत नसल्याचे कळविले आहे.

त्यानुसार राखीव २ दिवसांपैकी १ दिवस गणेशोत्सवासाठी (गणेशोत्सवातील सातवा दिवस) सूट देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी जारी केले आहेत.

गणेशोत्सवासाठी यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवार २३ सप्टेंबर (पाचवा दिवस- गौरी विसर्जन), रविवार २४ सप्टेंबर (सहावा दिवस), मंगळवार २६ सप्टेंबर (आठवा दिवस), बुधवार २७ सप्टेंबर (नववा दिवस), गुरुवार २८ सप्टेंबर (दहावा दिवस- अनंत चतुर्दशी) असे पाच दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती.

नव्या आदेशात एक दिवस वाढला

आता नव्याने सोमवार २५ सप्टेंबर २०२३ (सातवा दिवस) सह एकूण सहा दिवस नियमांचे पालन करून गणेशाेत्सव मंडळांना ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

pune, ganeshotsav 2023, ganpati festival 2023, ganesh festival 2023
Onion Traders Indefinite Strike : नाशकातील १५ बाजार समित्यांचा कांदा लिलाव आजही बंदच; परवाने रद्द हाेणार, गाळे ताब्यात घेतले जाणार? एपीएमसीसह व्यापा-यांची बैठक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com