Onion Traders Indefinite Strike : नाशकातील १५ बाजार समित्यांचा कांदा लिलाव आजही बंदच; परवाने रद्द हाेणार, गाळे ताब्यात घेतले जाणार? एपीएमसीसह व्यापा-यांची बैठक

पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा व्यापाऱ्यांची तातडीची बैठक बाेलावली आहे.
Onion, lasalgaon apmc meeting
Onion, lasalgaon apmc meeting Saam tv
Published On

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील सुमारे १५ बाजार समित्यांमधील कांदा लिलाव आज (गुरुवार) सलग दुसऱ्या दिवशी बंदच राहिला आहे. कांद्याची उलाढाल ठप्प झाल्याने कोट्यवधींचं नुकसान हाेत आहे. दरम्यान लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर आज लासलगाव बाजार समिती प्रशासन कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

Onion, lasalgaon apmc meeting
Kolhapur News : कानशिलात मारु म्हणता... आमदार भडकले, म्हणाले आम्हांलाही...

कांदा खरेदीदार व्यापा-यांनी बुधवापासून (ता. २० सप्टेंबर) कांदा लिलाव बेमुदत बंद ( nashik onion auction) ठेवला आहे. आजच्या दूस-या दिवशी देखील बंदच्या भूमिकेवर कांदा व्यापारी असोसिएशन ठाम राहिले आहे.

दरम्यान लासलगाव बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या ताब्यातील बाजार समिती आवारातील तसच आवारा बाहेरील गाळे, जागा आणि अन्य सोयी सुविधाही ताब्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे.

Onion, lasalgaon apmc meeting
Ganeshotsav 2023 : गणेशाेत्सव काळात गाैतमी पाटीलच्या ठुमक्यांवर बंदी, पाेलीसांचा निर्णय

कांदा लिलावास इच्छूक असलेल्या नव्या व्यापाऱ्यांना परवाने देण्याच्याही सूचना केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. व्यापाऱ्यांवर कारवाईच्या निर्णयासाठी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती संचालक मंडळाची १० वाजता तातडीची बैठक हाेणार आहे. दरम्यान व्यापारी मात्र बंदच्या निर्णयावर आजही ठाम असल्यानं वाद चिघळण्याची चिन्हं निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने उद्या दुपारी तीन वाजता येवला येथे बैठक बाेलावली आहे. जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रशासनाची कारवाई आणि पुढील भूमिका याविषयावर चर्चा हाेणार आहे.

पालकमंत्र्यांनी बाेलावली तातडीची बैठक

दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा व्यापाऱ्यांची तातडीची बैठक बाेलावली आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यतील कांदा लिलाव बंद आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या मध्यस्तीने लिलाव सुरू होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Onion, lasalgaon apmc meeting
Eco-Friendly Ganpati साकारुन 'वीर मराठा' ने सामाजिक बांधिलकी जाेपासात समाजापुढे ठेवला आदर्श

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com