Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Nanded: डोळ्यात मिर्ची पुड टाकून व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना अटक

या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंता निर्माण झाली हाेती.

संतोष जोशी

नांदेड : नांदेड (nanded) शहरात एका व्यापाऱ्याला तलवारीचा धाक दाखवत आणि डोळ्यात मिर्ची पुड टाकून चार लाख रुपयांसह त्याची दुचाकी (vehicle) घेऊन पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी (police) ४८ तासांत अटक (arrest) केली आहे. (nanded latest marathi news)

वाजेगाव येथील किराणा मालाचे होलसेल व्यापारी सय्यद आतिक सय्यद रशीद हे तीन दिवसांपूर्वी दुकान बंद करुन रात्री सिडको येथे घराकडे जात असताना शहरातील कापूस केंद्राजवळ तिघांनी सय्यद अतिक यांना अडवून त्यांना तलवारीचा धाक दाखवत डोळ्यात मिर्ची पुड टाकली आणि चार लाखांची बॅग, दुचाकी घेऊन पसार झाले.

या घटनेची माहिती सय्यद अतिक यांनी पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळावर पाेहचले. त्यावेळी त्यांना तेथे एक मोबाईल सापडला. या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी माग काढत सोहेब खान शब्बीर खान, नूर खान हुसेन खान पठाण आणि सय्यद ताहेर या तिघांना अटक केली. या प्रकरणी तिघां विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

SCROLL FOR NEXT