Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येणार, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? यामागचे सत्य लवकरच समोर येणार आहे. २८ फेब्रुवारीपूर्वी सत्य समोर येईल. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड झाला आहे.
Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येणार, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड
Ajit Pawar Plane Crashsaamtv
Published On

Summary -

  • अजित पवार यांच्या विमान अपघातामागचं सत्य समोर येणार

  • डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड

  • प्राथमिक चौकशी अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वी येण्याची शक्यता

  • पवार कुटुंबीयांना घातपाताचा संशय

अक्षय बडवे, पुणे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला नसून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अपघात प्रकरणाची कसून चौकशी केली जावी अशी मागणी पवार कुटुंबीयांसह अनेक राजकीय नेत्यांनी केली. अजित पवार यांच्या विमान अपघातामागचे सत्य लवकरच समोर येणार आहे. अजित पवारांच्या विमाना अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वी येणार असल्याचे सांगितले जात आहे. सर्वाचे लक्ष या प्राथमिक अहवालाकडे लागले आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या विमाना अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ तारखेपूर्वी येणार आहे. डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड झाला आहे. त्यामुळे अपघातावेळी नेमकं काय घडलं होतं याची संपूर्ण माहीती समोर येईल. याचसोबत कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरला (CVR) उष्णतेमुळे नुकसान झाल्याची माहिती देखील सांगितली जात आहे.

Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येणार, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड
Ajit Pawar Death: अजित पवारांचे AI व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर होणार कारवाई

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार आणि जय पवार यांना घातपात असल्याचा संशय आहे. संपूर्ण पवार कुटुंबाला वाटत आहे की हा अपघात नसून घातपात आहे. रोहित पवार यांनी आतापर्यंत दोन पत्रकार परिषद घेत अजितदादांच्या विमान अपघातावर अनेक प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केला. अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. तर अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणी केली. व्हीएसआर कंपनीला विमानाचे उड्डाण करण्यास तात्काळ बंदी घालावी, असे देखील ते म्हणाले.

Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येणार, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड
Ajit Pawar Death: अजितदादांचा घात झाला? अमोल कोल्हेंनी थेट अहमदाबाद विमान अपघाताचा संदर्भ दिला

दरम्यान, अजित पवार यांच्या विमानाला २८ जानेवारीला अपघात झाला होता. बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. अजितादाद मुंबईवरून बारामतीला जात होते. पण बारामतीत पोहचण्यापूर्वीच त्यांच्या विमानाला अपघात झाला. अजितदादा जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी बारामतीला निघाले होते. या अपघातामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा हादरला बसला. या प्रकरणाचा तपास सध्या केला जात आहे. हा अपघात कशामुळे झाला यामागचे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य समोर येणार, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरीत्या डाउनलोड
Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांनाही संशय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com