अजित पवारांच्या मृत्यूनंतर दादांचा अपघात की घातपात याची चर्चा सुरु झाली.. त्यातच रोहित पवारांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करत अनेक प्रश्न उपस्थित केले... मात्र आता फक्त रोहित पवारच नाही तर अजितदादांच्या घातपाताबद्दल सर्वच पवारांचं एकमत झाल्याचं समोर आलंय.दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी करत व्हीएसआर कंपनीची उड्डाणं तात्काळ रद्द करण्याची मागणी जय पवारांनी केलीय..
जय पवारांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचं संपूर्ण, पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे.. VSR ला तात्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घालावी आणि VSR च्या संभाव्य गैरव्यवहाराची सखोल चौकशी कऱण्याची मागणी जय पवारांनी केलीय.. दुसरीकडे रोहित पवार उपस्थित करत असलेल्या मुद्द्यांची उत्तरं मिळत नसल्यानं महाराष्ट्राच्या मनात संशयाचं धुकं गडद होत असल्याचं सुळेंनी म्हटलंय..
एका बाजूला रोहित पवार तथ्यांसह उपस्थित करत असलेले मुद्दे तर दुसरीकडे सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवारांच्या मनातील संशयामुळेच त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलीय.. त्यामुळे पवार कुटुंबासह महाराष्ट्रातील जनतेच्या मनात वाढत चाललेलं संशयाचं धुकं आणखी गडद होण्याऐवजी सरकारने त्रयस्थ संस्थेमार्फत सखोल चौकशी करुन सत्य समोर आणायला हवं....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.