राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरु झालीय... राज्यसभेसाठी शरद पवारांच्या उमेदवारीची चर्चा असतानाच काँग्रेसच्या एका गटानं त्यांना विरोध दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...त्यात राष्ट्रवादीची भाजपसोबत वाढती जवळीक आणि विलीनीकरणाच्या चर्चांमुळे ही जागा पवारांना देऊ नये, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये पाहायला मिळतोय...
तर महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या ठाकरेसेनेत राज्यसभा उमेदवारीवरून वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतायत... रोटेशननुसार राज्यसभेची जागा ठाकरेसेनेची असल्याचा दावा करत आदित्य ठाकरें करत असतानाच संजय राऊतांनी मात्र शरद पवारांच्या नावालाच प्राधान्य दिलय. येत्या 26 फेब्रुवारीपासून राज्यसभेच्या 7 जागांसाठी अर्ज भरायसा सुरवात होईल. सध्याच्या सत्ता समीकरणानुसार राज्यसभेत कोणाचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात ते पाहूयात...
विधानसभेतील एकूण 288 आमदारांपैकी भाजपचे शिवाजीराव कर्डिले आणि अजित पवारांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत.. अशावेळी 286 आमदार राज्यसभेसाठी मतदान करणार आहेत...त्यापैकी भाजपकडे 131, शिंदेसेनेकडे 57 तर दादांच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत.. राज्यसभा खासदार निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 41 आमदारचा पाठिंबा मिळणं गरजेचं आहे... त्यामुळे महायुतीचे 228 आमदार आणि अपक्षांच्या मदतीनं जास्तीत जास्त राज्यसभेचे 6 उमेदवार निवडून येतील.. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 10, ठाकरेसेनेचे 20 आणि काँग्रेसकडे 16 आमदारांचं संख्याबळ असल्यानं मविआ फक्त 1 उमेदवार निवडून आणू शकते...
या गणितामुळे राज्यसभेत एकच उमेदवार देणं मविआसाठी फायदेशीर आहे..मविआतील अंतर्गत वादाचा भाजपला फायदा होऊ नये याची दक्षता विरोधकांनी घ्यायला हवी... तर दुसरीकडे राज्यसभेच्या 7 ही जागांसाठी बिनविरोध निवडणुक होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय... त्यामुळे मविआ राज्यसभेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.