man burns his friends brand news inova car x
महाराष्ट्र

Nanded News : उधारीला नकार, मित्रानी पेटवली कार! मित्राकडून उधार पैसे घेतले? ताबडतोब पैसे परत करा...

Nanded Crime News : उधारी थकवली असेल तर काय होतं...याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मात्र नांदेडमध्ये उधारीवरुन दोस्तीत कुस्ती झालीय.... मित्राने उधारीचे पैसे परत केले नाहीत म्हणून एकानं चक्क नवी कोरी इनोव्हा कारच जाळून टाकलीये. पाहूया त्यावरचाच एक विशेष रिपोर्ट...

Snehil Shivaji

जर तुम्ही तुमच्या मित्राकडून उधारीवर पैसे घेतले असतील तर आज आता ताबडतोब पैसे परत करा. अन्यथा तुमच्या गाडीची अशी अवस्था होऊ शकते. ही आग लागलेली अगदी नवी कोरी कार आहे इनोव्हा....25 ते 30 लाखांच्या या चकचकीत इनोव्हाला आग कशी लागली ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...ही कार आपोआप पेटली तिला पेट्रोल टाकून चक्क जाळण्यात आलंय. होय.. होय.. होय.. ही लाखो रुपयांची कार चक्क जाळण्यात आलीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्राकडून घेतलेल्या उधारीचा आणि कार जाळण्याचा काय संबंध ? तर ऐका..

नांदेडमध्ये एका युवकानं उधार घेतलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे त्याचा मित्र संतापला. मित्राला अद्दल घडवण्यासाठी त्यानं थेट मित्र चालवत असलेली नवी कार स्वाहा केलीये.या दोन ड्राईव्हर मित्रांच्या वादात मालकाचं मात्र लाखो रुपयांचे नाहक नुकसान झालंय.

गाडी मालक मंजीत पवार यांच्या इन्होवा गाडीवर सध्या बाळासाहेब जाधव हे ड्राईव्हर म्हणून काम करत होते. बाळासाहेब जाधव आणि आरोपी दिनेश राठोड यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणींवरून वाद झाला. म्हणूनच बाळासाहेब यांना अद्दल घडवण्यासाठी राठोड याने बाळासाहेब चालवत असलेली मंजित पवारांची गाडी जाळून बदला घेतलाय. विशेष म्हणजे दिनेश राठोड हा देखील यापुर्वी मंजीत पवारांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे त्यानं असं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय.

मित्राला अद्दल घडवता घडवता टोकाचं पाऊल उचलणारा हा मित्र आज गजाआड झालाय. त्यामुळे मित्राला मदत करतांना एकदा नव्हे तर दहावेळा विचार करा. कारण मैत्रीत मोजमाप नसावं. मैत्रित व्यवहार आला की वाद होतात. दोन मित्रांच्या वादात तिसऱ्याला नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी....त्यामुळे मैत्रीचं नातं राखा, उधारीचं नातं संपवा, नाहीतर मित्राचा राग पेट्रोल बनायला वेळ लागत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT