Nana Patole Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : भावी मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलतोय का? पत्रकारांच्या प्रश्नावर नाना पटोले हसले अन्....

Nana Patole On Maharashtra CM : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना आज पत्रकारांनी, आम्ही महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्यांशी बोलत आहोत का? असा प्रश्न केला, त्यावर नाना पटोले केवळ हसले आणि निघून गेले.

Sandeep Gawade

विधासभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतून मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण यावर सध्या चर्चांना उधाण आलं आहे. आज महाविकास आघाडीची विधानसभेच्या जागावाटपाबाबत बैठक पार पडली. यावेळी पत्रकांरांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुंख्यमंत्रिपदावरू प्रश्न केला. आम्ही महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री यांच्याशी बोलत आहोत का? असा प्रश्न पत्रकारांनी केला होता. त्यावर नाना पटोले हसले आणि उत्तर न देता निघून गेले.

महाविकास आघाडीची जागावाटप बाबत एक बैठक झाली आहे. यासंदर्भात पुढेही एकत्र बसून चर्चा करणार आहोत. 20 ऑगस्ट ला मुंबईत बैठक आहे, त्याची चर्चा सुरू आहे. या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या बैठीत मुख्यमंत्रि‍पदाची घोषणा होऊ शकते. मात्र सध्या मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलही चर्चा नाही. काँग्रेसकडे तिकीट मागणाऱ्यांची लाईन लागली आहे, हजारो अर्ज आले आहेत.

भूसंपादन, कर्जमाफी प्रोत्साहन पैसे अद्याप दिलेले नाहीत. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार जबाबदार आहेत. हे निर्लज्ज सरकार आहे यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असा घणाघाती आरोप त्यांनी महायुतीवर केला आहे. महाराष्ट्र भ्रष्टाचारी राज्य म्हणून देशात प्रसिद्ध झालं आहे. राज्यात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जिथं आमचं सरकार आहे तिथे या योजना आहेत. आमची कॉपी ते करत आहेत, त्यामुळं घाबरण्याची काही गरज नाही.

बटण दाबल नाही तर योजना बंद होईल अस अजित पवार म्हणाले, कालही एकजण अस बोलला. लाडक्या खुर्चीला कोणी घाबरायची गरज नाही. फडणवीस यावर बोलायला तयार नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यंमंत्री होते. जर यावेळी महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर त्यांच्याच गळ्यात मुख्यंमत्रिपदाची माळ पडते की कॉंग्रेसमधील कोणाला संधी देण्यात येते, हे पहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ; तुमच्या शहरातील दर काय? जाणून घ्या

Nutrition Tips: जाणून घ्या,नवजात बाळाच्या विकासासाठी योग्य आहार

Exit Poll Maharashtra : कागलमध्ये समरजित घाटगे मारणार बाजी? पाहा Exit Poll

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Satara Exit Poll: सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप की शिवसेना ठाकरे गट कोण मारणार बाजी? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT