Maharashtra Politics : सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक होती, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य

Ajit Pawar Regrets fielding Sunetra Pawar Against supriya sule : विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभं करणं मोठी चूक असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय.
Sharad PAwar, Ajit Pawar, Supriya Sule
Sharad PAwar, Ajit Pawar, Supriya Sule Saam TV
Published On

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही सोलापूर

लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत झाली होती. ही लढत संपूर्ण राज्यामध्येच चर्चेचा विषय ठरली होती. आता विधानसभेच्या तोंडावर अजित पवार यांनी या निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केल्याचं समोर आलंय. बारामतीमध्ये बहिणीविरोधात उमेदवारी देऊन मी चूक केली, अशी कबूली अजित पवार यांनी दिलीय.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया काय?

सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्राला उभं करणं मोठी चूक (Maharashtra Politics) होती, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना केलं होतं. यावर आता खासदार सु्प्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. अजित दादा यांच मी स्टेटमेन्ट वाचलं आणि ऐकलं नाही, रामकृष्ण हरी! असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. दरम्यान अजित पवार यांना राजकारण घरात शिरू द्यायचं नसतं, असंही वक्तव्य केलंय.

सुनेत्रा पवार यांचा पराभव

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असा सामना रंगला होता. यामध्ये सुप्रिया सुळेंचा मताधिक्याने विजय तर सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत असताना अजित पवारांना बहिणीविरूद्ध बायकोला उभं केल्याची चूक मान्य (lok sabha Election) केलीय. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या असल्याचं दिसत आहे.

Sharad PAwar, Ajit Pawar, Supriya Sule
Supriya Sule Mobile Hacked: खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक, तक्रारीनंतर मोबाईल पुन्हा सुरू; काय आहे प्रकरण?

अजित पवार यांचं वक्तव्य

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील गेल्या वर्षी दोन गट पडले होते. अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये शरद पवार यांची साथ सोडत महायुती सरकारमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २ जुलै २०२३ रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा भार स्वीकारला होता. शरद पवारांच्या भूमिकेमुळे त्यांनी साथ सोडल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. शरद पवार विरूद्ध अजित पवार असं चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, आता अजित पवार यांनी सुप्रिया सुळे (supriya sule) विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत व्हायला नको होता, असं म्हटलंय.

Sharad PAwar, Ajit Pawar, Supriya Sule
Ajit Pawar Security : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका? पोलिसांनी वाढवली सुरक्षा, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com