Vande Bharat Express x
महाराष्ट्र

Vande Bharat Express : नागपूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

Nagpur–Indore Vande Bharat Express : नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये भारतीय रेल्वेने मोठा बदल केला आहे. २४ नोव्हेंबरपासून ही गाडी ८ ऐवजी १६ डब्यांसह धावणार असून प्रवाशांसाठी ११२८ आसनक्षमता उपलब्ध होणार आहे.

Namdeo Kumbhar

  • नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस आता ८ ऐवजी १६ डब्यांसह धावणार आहे.

  • आसनक्षमता ५३० वरून वाढून ११२८ प्रवासी इतकी होणार आहे.

  • २ एक्झिक्युटिव्ह क्लास आणि १४ एसी चेअर कार्स अशा नवीन कोच रचनेची सुविधा मिळणार आहे.

  • वाढत्या मागणीमुळे आणि सणांच्या गर्दीमुळे प्रवाशांना सुलभ प्रवास मिळावा म्हणून रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

Full timing and route details of the upgraded Nagpur–Indore Vande Bharat Express : नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये भारतीय रेल्वेने बदल केले आहेत. सोमवारपासून (२४ नोव्हेंबर) ही ट्रेन १६ डब्यांसह धावणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहून रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसने डब्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. १६ डब्ब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसमधून आता ११२८ जण प्रवास करतील. याआधी ही संख्या ५३० इतकी होती. रेल्वेच्या या निर्णायामुळे आता नागपूर-इंदौर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसमधून दररोज अतिरिक्त ६०० प्रवाशांना आरामात प्रवास करण्याची संधी मिळेल. या बदलामुळे सण आणि गर्दीच्या वेळी आराम मिळेल.

नागपूर–इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 20912/20911) साठीच्या वाढत्या मागणीचा विचार करून, रेल्वेने ही गाडी सध्या असलेल्या ८ कोचेस ऐवजी १६ कोचेससह २४.११.२०२५ पासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 20912/20911 नागपूर – इंदौर वंदे भारत एक्स्प्रेस आता विद्यमान ८-कोच रेकऐवजी १६-कोच संरचनेसह चालवणार.

२ वातानुकुलीत एक्झिक्युटिव्ह क्लास आणि १४ एसी चेयर कार्स वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असतील. सोमवारपासून इंदौर आणि नागपूर दोन्ही ठिकाणांहून सुटणाऱ्या गाड्यासाठी ही सुविधा लागू होणार आहे. उच्च वेग, सुरक्षेची उच्च मानके आणि आधुनिक प्रवास अनुभवामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला सतत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कोच संख्या वाढल्यामुळे आसनक्षमतेत मोठी वाढ होईल, प्रतीक्षा यादी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल.

वंदे भारत एक्सप्रेसची वेळ काय ?

वंदे भारत एक्सप्रेस इंदौरहून सकाळी ०६:१० वाजता निघेल आणि उज्जैनला ०६:५० वाजता, भोपाळला ०९:१० वाजता, नर्मदापुरमला १०:२२ वाजता, इटारसीला १०:४५ वाजता, बैतुलला ११:५८ वाजता आणि नागपूरला ०२:३५ वाजता पोहोचेल.

वंदे भारत एक्सप्रेस नागपूरहून ०३:२० वाजता निघेल. ती बैतुलला ०५:२३ वाजता, इटारसीला ०७:०० वाजता, नर्मदापुरमला ०७:२२ वाजता, भोपाळला ०८:३८ वाजता, उज्जैनला १०:४० वाजता आणि इंदौरला ११:५० वाजता पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone Video : बायको असावी तर अशी! 'धुरंधर'च्या यशाचा जल्लोष; दीपिकाने रणवीरसाठी बनवला 'हा' खास मराठमोळा पदार्थ

Dalimb Juice Recipe: थंडीत डाळिंबाचा टेस्टी आणि फ्रेश ज्यूस नक्की प्या, वाचा ही सोपी रेसिपी

AC Fridge Price Hike: २०२६ च्या पहिल्याच दिवशी महागाईचा फटका; AC, फ्रिजच्या किंमती वाढल्या

एकाच वेळी दोघांना एबी फॉर्म! उमेदवाराने दुसर्‍याचा AB फॉर्म गिळला अन् विषयच संपवला, पुण्यात नेमकं काय घडलं?

Nagpur Politics: का रे दुरावा! नवऱ्याची भाजपसोबत बंडखोरी, माजी महापौरांच्या डोक्यात तिडीक गेली; सासर सोडून थेट माहेर गाठलं

SCROLL FOR NEXT