Nagpur-Pune-Nagpur Express Saam TV
महाराष्ट्र

Pune-Nagpur Express : ना वंदे भारत, ना तेजस, नागपूरहून पुण्यासाठी धावणार नवी सुपरफास्ट ट्रेन, वेळापत्रक काय?

New Train From Nagpur To Pune : नागपूर-पुणे यादरम्यान आता नवीन ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक काय असेल? कोणत्या स्थानकात थांबणार, याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

Namdeo Kumbhar

Nagpur-Pune-Nagpur Express : नागपूर-पुणे-नागपूर या दोन शहरामध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रस्ते आणि रेल्वे या दोन्ही मार्गाने प्रवास होतो. पण या मार्गावर रेल्वेची संख्या मर्यादीत असल्यामुळे मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. नागपूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे नागपूर विभागाने पाठवला आहे. पण त्याआधीच नागपूर-पुणे या मार्गावर नवीन ट्रेन धावणार आहे. या ट्रेनचा मार्ग काय असेल? तिकिट किती असेल? ही ट्रेन नेमकी कुठे कुठे थांबणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात..

केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून रीवा-पुणे या साप्ताहिक एक्स्प्रेसला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नागपूरला पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याशी जोडणारी आणखी एक ट्रेन मिळाली आहे. ही नवीन ट्रेन प्रत्येक बुधवारी नागपूरहून सुटेल, तर पुण्याहून दर गुरुवारी निघेल. गाडी क्रमांक 20152/20151 रीवा येथून निघून सतना, कटनी, जबलपूर, नैनपूर, बालाघाट, गोंदिया आणि नागपूरमार्गे पुण्याला पोहचणार आहे. गाडीची सुरुवात तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

नागपूर-पुणे, ट्रेनची वेळ काय असेल ?

ही साप्ताहिक ट्रेन 20 डब्यांची असेल. महत्त्वाच्या प्रत्येक स्थानकावर ही ट्रेन थांबणार आहे. रीवा-पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस दर बुधवारी सकाळी 6:45 वाजता रीवाहून निघेल, संध्याकाळी 6:20 वाजता नागपूरला पोहोचेल आणि गुरुवारी सकाळी 9:45 वाजता पुण्याला येईल. तर पुणे-रीवा एक्स्प्रेस दर गुरुवारी दुपारी 3:15 वाजता पुण्याहून सुटेल, दुसऱ्या दिवशी सकाळी 5:25 वाजता नागपूरला पोहोचेल आणि सायंकाळी 5:30 वाजता रीवाला पोहोचेल. म्हणजे पुणे-नागपूर हा प्रवास फक्त १४ ते १५ तासांत होणार आहे.

पुणे-नागपूर या मार्गावर कुठे कुठे थांबणार ट्रेन -

नागपूर-पुणे यादरम्यान रल्वे प्रवासात आता आणखी एक ट्रेन उपलब्ध झाली. १४ तासांमध्ये नागपूर-पुणे प्रवास होणार आहे. नव्या ट्रेनला वर्धा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड येथे थांबे असतील. गाडीत चार सामान्य, सहा स्लीपर, तीन एसी थर्ड टियर, तीन थर्ड एसी इकॉनॉमी आणि दोन सेकंड एसी डबे असतील.

नागपूर-पुणे मार्गावर कोण कोणत्या ट्रेन धावतात ?

नागपूर आणि पुणे दरम्यान थेट गाडीची मागणी नेहमीच होती. सध्या नागपूर-पुणे-नागपूर एक्स्प्रेस, गरीब रथ एक्स्प्रेस, हमसफर आणि आजनी-पुणे एसी स्पेशल या गाड्या धावतात. याशिवाय, आझाद हिंद एक्स्प्रेस, हटिया-पुणे एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि पुणे एसी दुरंतो सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्याही उपलब्ध आहेत.

नागपूरकरांना सर्वाधिक फायदा -

पुणे-रीवा ही साप्ताहिक ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. याचा सर्वाधिक फायदा नागपूरकरांना होणार आहे. रीवा, कटनी, सतना आणि जबलपूर परिसरातील अनेक लोक चांगल्या वैद्यकीय उपचारांसाठी नागपूरला येतात. सध्या शहडोल आणि रीवा एक्स्प्रेसमधील 90% जागा नागपूरला वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या प्रवाशांनी व्यापलेल्या असतात. त्यामुळे या गाडीत रीवा ते नागपूर दरम्यान मोठ्या संख्येने प्रवासी असतील. त्याशिवाय नागपूर-पुणे यादरम्यान प्रवास कऱणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT