मुंबई-नागपूर दरम्यान धावणार Vande Bharat Express, ५ तासांनी कमी होणार अंतर

Mumbai Nagpur Vande Bharat Express : राजधानी आणि उपराजधानीदरम्यान वंदे भारत ही आरामदायी ट्रेन लवकरच सुरू होणार आहे. दोन्ही शहरांमध्ये प्रवाशांची संख्या पाहाता रेल्वेकडून लवकरच घोषणा करण्यात येईल.
Vande Bharat Express
Mumbai Nagpur Vande Bharat ExpressGoogle
Published On

Mumbai Nagpur Vande Bharat Express News Update : मुंबई आणि नागपूर ही महाराष्ट्रातील दोन शहरे आणखी जवळ येणार आहेत. कारण, मुंबई ते नागपूर यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीच्या प्रवासाला सध्या १४ तास वेळ लागतो, पण वंदे भरात एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर हा प्रवास पाच तासांनी कमी होणार आहे. भारतीय रेल्वेकडून मुंबई आणि नागपूर या मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. या हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती असणार? स्पीड काय असणार? कोण कोणत्या स्थानकावर ही ट्रेन थांबणार? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

१४ तासांचा प्रवास फक्त ९ तासांत Nagpur to Mumbai Vande Bharat Express Route, Distance, Travel Time

वंदे भारतमुळे प्रवाशांचा वेळतर वाचणार आहेच. पण आरामदायी प्रवासाचा अनुभवही प्रवाशांना मिळणार आहे. मुंबई ते नागूपर या प्रवासासाठी सध्या इतर ट्रेनला १४ ते १५ तासांचा वेळ लागतो. हायस्पीड वंदे भारत 800 किमीचे हे अंतर फक्त ९ तासांत पार करणार आहे. म्हणजेच मुंबई नागपूर या मार्गावर ट्रेनने प्रवास करणाऱ्यांचे तब्बल पाच तास वाचणार आहेत.

Vande Bharat Express
Vande Bharat: मुंबईतून धावणार वंदे भारत स्लीपर, १४०० किमी फक्त १० तासांत; तिकीट किती?

कुठे कुठे थांबणार वंदे भारत? Nagpur to Mumbai Vande Bharat Train Stoppages

मुंबई ते नागपूर वंदे भारत ट्रेनची घोषणा अद्याप झालेली नाही. लवकरच रेल्वेकडून या मार्गावरील वंदे भारत ट्रेनची घोषणा केली जाईल. त्यामुळे ट्रेन कुठे कुठे थांबणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत ट्रेन महत्त्वाच्या स्थानकात थांबेल. त्यामध्ये दादर, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, अकोला, भंडारा, वर्धा या स्थानकाचा समावेश असेल. मुंबईवरून जळगाव हा प्रवास फक्त चार तासात पूर्ण होईल.

Vande Bharat Express
Vande Bharat : मुंबई- नागपूर रेल्वे मार्गावर धावणार वंदे भारत, ९ तासांत टच्च; भाडं किती अन् थांबा कुठे?

मुंबई-नागपुर वंदे भारत तिकिट किती? Nagpur to Mumbai Vande Bharat Express Ticket Price

वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रतितास १६० ते १७० किमी वेगाने धावते. नागपूर ते मुंबई यादरम्यान वंदे भारतचे तिकिट १५०० रूपये ते ३५०० यादरम्यान असेल. मुंबई ते नागपूर यादरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. रेल्वेकडून याला हिरवा कंदील देण्यात आला असून लवकरच घोषणा केली जाईल.

Vande Bharat Express
Vande Bharat : वंदे भारत नागपूरहून मुंबईसाठी धावणार, कुठे कुठे थांबणार? तिकीट किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com