Vande Bharat: मुंबईतून धावणार वंदे भारत स्लीपर, १४०० किमी फक्त १० तासांत; तिकीट किती?

Vande Bharat Sleeper Coaches: मुंबई ते बरेली दरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे, कारण बरेली ते मुंबई मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Vande Bharat Train
Vande Bharat TrainSaam Tv
Published On

मुंबई ते बरेली प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच मुंबई ते बरेली दरम्यानचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे, कारण बरेली ते मुंबई मार्गावर स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आत्तापर्यंत वंदे भारत ट्रेनमध्ये फक्त चेअर कार सीट्स होत्या. मात्र, आता लवकरच स्लीपर कोचही प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत. रेल्वेच्या फेऱ्या आणि प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन बरेली ते मुंबई मार्गावर स्लीपर वंदे भारत चालवण्याचा विचार सुरू आहे.

Vande Bharat Train
12th HSC Result: वाह रं पठ्ठ्या! सांगलीच्या पोराला प्रत्येक विषयात ३५ गुण, मार्कशीट सोशल मीडियात व्हायरल

सध्या १४३१३/१४ लोकमान्य टिळक–बरेली एक्स्प्रेसवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. आठवड्यातून एकदाच धावणाऱ्या या ट्रेनसाठी प्रवाशांना दोन महिने आधीच तिकिटांचे बुकींग करावे लागते, तरीही कन्फर्म तिकिट मिळणे कठीणच आहे.

Vande Bharat Train
Mock Drill: उठा अन् सज्ज व्हा! मुंबई, ठाणे, पुणे; राज्यात १६ ठिकाणी होणार मॉक ड्रिल, पाहा यादी..

नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एसी थ्री टियर, एसी टू टियर आणि एसी फर्स्ट क्लास कोच असतील, ज्यात एकूण सुमारे ८२३ प्रवासी बसू शकतील. वंदे भारत स्लीपर सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होणार, हे निश्चित मानले जात आहे.

Vande Bharat Train
Tragic Love: शिक्षक अन् विद्यार्थिनी OYO मध्ये गेले, १० तास बाहेर आलेच नाही, दरवाजा तोडताच दोघेही बेडवर..

दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांकडून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंतिम आदेश आल्यानंतरच स्लीपर कोच तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com