Tejas Express : मुंबईतून धावणार दोन स्पेशल तेजस एक्सप्रेस, जाणून घ्या तिकिट अन् मार्ग

New Tejas Express Train News Update : पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रलहून राजकोट आणि गांधीधामसाठी दोन विशेष तेजस एक्सप्रेस गाड्या सुरू. मार्ग, थांबे, वेळापत्रक आणि तिकीट याबाबतची संपूर्ण माहिती येथे वाचा.
Indian Railway
Tejas ExpressSaam Tv
Published On

New Tejas Express Train : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर दोन स्पेशल तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे वाढती गर्दी आणि प्रवाशांची मागणी पाहता पश्चिम रेल्वेने मुंबईमधून २ तेजस एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रेल्वे मुंबई सेंट्रल ते राजकोट (Mumbai Central-Rajkot) आणि मुंबई सेंट्रल-गांधीधाम (Mumbai Central-Gandhidham) दरम्यान सुपरफास्ट तेजस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विशेषतः उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या वाढत्या संख्येला पाहून पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

मुंबई सेंट्रेल ते राजकोट, तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस - Train No. 09005/09006 Mumbai Central – Rajkot Tejas Superfast Bi-weekly Special

मुंबई सेंट्रल ते राजकोट या दरम्यान ३० मे ते २७ जून यादरम्यान तेजस सुपरफास्ट एक्सप्रेस धावेल. मुंबई सेंट्रेल स्थानकातून प्रत्येक बुधवार आणि शुक्रवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी एक्सप्रेस निघेल. राजकोट येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल.

राजकोटवरून प्रत्येक गुरूवारी आणि शनिवारी मुंबई सेंट्रेलकडे सायंकाळी साडेसहा वाजता रवाना होईल. मुंबईमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता पोहोचेल.

कुठे कुठे थांबणार -

मुंबई सेंट्रल ते राजकोट या मार्गावर, ही गाडी दोन्ही दिशांना बोरीवली, वापी, सूरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर आणि वांकानेर स्थानकांवर थांबेल.

Indian Railway
Maharashtra Politics : अजित पवारांवर बोलताना औकातीत राहून बोलावं, अमोल मिटकरींचा हाकेंवर वार

मुंबई सेंट्रल-गांधीधाम - Mumbai Central – Gandhidham Tejas Superfast Weekly Special

मुंबई सेंट्रल-गांधीधाम विशेष गाडी प्रत्येक सोमवारी मुंबई सेंट्रल येथून रात्री 23:20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12:55 वाजता गांधीधामला पोहोचेल. ही गाडी दोम जून पासून ३० जूनपर्यंत चालेल. त्याचप्रमाणे गांधीधाम-मुंबई सेंट्रल विशेष गाडी प्रत्येक मंगळवारी गांधीधाम येथून सायंकाळी 18:55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 07:30 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी 03 जून 2025 पासून 01 जुलै 2025 पर्यंत चालेल.

कुठे कुठे थांबणार -

मुंबई सेंट्रल-गांधीधाम या मार्गावर ही गाडी दोन्ही दिशांना बोरीवली, वापी, सूरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, समाखियाली आणि भचाऊ या स्थानकांवर थांबेल. या गाडीत फर्स्ट एसी, एसी 2-टियर आणि एसी 3-टियर डबे आहेत.

Indian Railway
Nilesh Chavan Arrested: ३ राज्यातून प्रवास, अखेर १० दिवसानंतर नेपाळमध्ये बेड्या, निलेश चव्हाणला आज कोर्टात हजर करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com