
सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Nilesh Chavan Arrested : वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला घेऊन पोलीस पिंपरी चिंचवडमध्ये पोहचले. निलेश चव्हाण याला नेपाळमधून बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी निलेश चव्हाणला आज सकाळी दहा वाजता पुणे सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांची आज पोलिस कोठडी संपणार आहे, या दोघांना आज दुपारी पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.
गेली दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या निलेशला नेपाळच्या बॉर्डरवर बेड्या ठोकण्यात आल्या. मग तिथून विमानाने त्याला पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री अडीच वाजता पुणे विमानतळावर पोहचले. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली अन पहाटे ४ वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला.
गेली दहा दिवस तीन राज्यातून प्रवास करत तो नेपाळमध्ये पोहचला होता, तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनालीत तो आला अन तिथंच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि ऍन्टी गुंडा स्कॉडने बेड्या ठोकण्यात आल्या अन पहाटे चार वाजता बावधन पोलिसांकडे त्याचा ताबा देण्यात आला.
निलेश चव्हाण याने दहा दिवस कसा प्रवास केला
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी हगवणे कुटुंबीय व्यतिरिक आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला दहा दिवसनातर अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलिसांनी नेपाळ बॉर्डर जवळून ताब्यात घेतले आहे.मात्र या दहा दिवसांत निलेश चव्हाण कुठे आणि पळाला पाहुयात...पुण्यातून निघताना काही पैसे सोबत घेतले.निलेश चव्हाण याने दोन ते तीन मोबाईल सोबत घेतले.त्यासोबत 5 ते 6 मोबाईल सिम कार्ड घेतले.सपूर्ण दहा दिवस खाजगी वाहनाने प्रवास करत पुण्यातून नवी मुंबई येथे पहिला मुक्काम केला.त्यानंतर मुंबई येथे मुक्काम केला.मुंबई नंतर निलेश चव्हाणा हा कर्जत,रायगड करून दिल्ली पोहचला.त्यानंतर दिल्ली मार्गे गोरखपूर येथे गेला त्या ठिकाणी 25 तारखेला मुक्काम केला.त्यानंतर उत्तर प्रदेश मधील सोनोली येथे मुक्काम केला.त्यानंतर सोनोली मार्गे नेपाळ काठमांडू येथे 26 मे ते 30 मे दरम्यान राहिला.काल 30 मे ला पोलिसांनी नेपाळ बॉर्डर जवळून अटक केली आहे
पुणे
मुंबई
कर्जत
रायगड
दिल्ली
गोरखपूर
सोनोली (उत्तरप्रदेश)
भैरवा (नेपाळ)
काठमांडू नेपाळ
भैरवा मार्गे सोनोली मध्ये आल्यावर अटक
नेपाळमध्ये 26 मे दुपार ते 30 मे पर्यंत मुक्कामी
कोण आहे निलेश चव्हाण
वैष्णवी हगवणेचा सासरा आरोपी राजेद्र हगवणे कुटुंबाचा निलेश चव्हाण हा निकटवर्तीय आहे. निलेश चव्हाण यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या अगोदरही निलेश चव्हाण याच्यावर गुन्हे दाखल आहेत. 2009 मध्ये वारजे पोलिसांनी एन सी दाखल केला. पिंपरी चिंचवड ड्रंक अँड ड्राइव्ह केस हिंजवडी पोलिसात दाखल आहे. 2022 ला ही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्या बायकोने तक्रार दिली होती. याबाबत आता कायदेशीर सर्व कारवाई केली जाईल. चव्हाणकडे लायसनवाले रिव्हॉल्व्हर होते ते ही आता पुणे पोलिस रद्द करणार आहे.त्याच रिव्हॉल्व्हरने कस्पटे कुटुंबांना धमकी दिली होती.त्याचा एक गुन्हा वारजे पोलीस स्टेशन दाखल आहे. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी बावधन पोलिसांनी ३० मे रोजी अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.