Maharashtra Politics : अजित पवारांवर बोलताना औकातीत राहून बोलावं, अमोल मिटकरींचा हाकेंवर वार

Amol Mitkari Laxman Hake clash : अजित पवारांवर केलेल्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा-ओबीसी वाद, निधी वाटप आणि राजकीय औकातीबाबत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
Maharashtra Politics : अजित पवारांवर बोलताना औकातीत राहून बोलावं, अमोल मिटकरींचा हाकेंवर वार
Amol MitkariSaam Tv
Published On

Amol Mitkari On Laxman Hake: लक्ष्मण हक्केंनी आपली औकात पहावी, नंतरच अजित पवारांवर बोलावं, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी हाकेंवर केला आहे. अजित दादांशी तुलना करताना आपली औकात लक्ष्मण हाकेने पहावी. त्याला जास्त भाव देण्याची गरज नाही. मराठा ओबीसी वाद निर्माण करण्यात लक्ष्मण हाके तुझा ही खारीचा वाटा आहे. तू ओबीसी साठी काय केलं ते जनतेला सांग? मी आमदार झाल्यावर माझ्या गावात माझी ग्रामपंचायत निवडून आणली. जिल्हा परिषदेत पराभूत झालो तरी सन्मानजनक मते मिळवली, असे अमोल मिटकरी म्हणाले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. त्यावरून आमदार म्हणून मिटकरींनी आता लक्ष्मण हाकेना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपलं डिपॉझिट गमावणारे लक्ष्मण हाके ओबीसींचे नेते कसे?, असा सवाल मिटकरी यांनी केलाय. 2014 च्या निवडणुकीत सांगोल्यातून लढतांना लक्ष्मण हाकेने एका वकिलाकडून 50 हजार रुपये घेतल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय.‌

लक्ष्मण हाके भूंकत राहिला तर मी त्याच्या विरोधात नक्कीच बोलेल. मी त्याच्या अंगावर त्याचे अंतर्वस्त्र पण शिल्लक ठेवणार नाही. तुला तुझ्या औकातीतच उत्तर द्यावे लागेल, असेही मिटकरी म्हणाले.

गोपीचंद पडळकरांच्या आरोपाला प्रत्युत्तर -

निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होतीय. त्यावरून आमदार अमोल मिटकरींनी पडळकरांना महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांसारखं बोलू नका, असं सल्ला दिलाय. त्यांना महाविकास आघाडीकडून काही मिळालं का?, असं म्हटलं तर पडळकरांना वाईट वाटेल, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

Maharashtra Politics : अजित पवारांवर बोलताना औकातीत राहून बोलावं, अमोल मिटकरींचा हाकेंवर वार
पुण्यात FIITJEE स्कॅम, ३१ विद्यार्थ्यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक

निधी कोणी पळवला किती पळवला हे त्यांनी अभ्यास करून पहावं. शेवटी आपण एका सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो. आमचे काही प्रश्न असले तर आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितो तक्रारी करतो परंतु असं आकांडतांडव करून काही साध्य होत नाही. त्यांना काही तक्रार असल्यास त्यांना अजित पवारांना भेटण्यास कमीपणा वाटत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं. गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीच्या प्रवक्त्या सारखं बोलू नये. त्यांना महाविकास आघाडी कडून काही आलं असं म्हणल्यास वाईट वाटेल, असे मिटकरी म्हणाले.

Maharashtra Politics : अजित पवारांवर बोलताना औकातीत राहून बोलावं, अमोल मिटकरींचा हाकेंवर वार
Nilesh Chavan Arrested: ३ राज्यातून प्रवास, अखेर १० दिवसानंतर नेपाळमध्ये बेड्या, निलेश चव्हाणला आज कोर्टात हजर करणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com