पुण्यात FIITJEE स्कॅम, ३१ विद्यार्थ्यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक

FIITJEE Scam in Pune: पुण्यातील FIITJEE क्लासेसने ३१ विद्यार्थ्यांची ४५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर. चार संचालकांवर गुन्हा दाखल. पैसे परत न झाल्याने पालकांचे संतापजनक प्रतिक्रिया.
PUNE FIITJEE Centre
PUNE FIITJEE CentreSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

FIITJEE Scam in Pune : पुण्यात FIITJEE स्कॅम झाल्याचं समोर आले आहे. यामझ्ये ३१ विद्यार्थ्यांची ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी जून २०२४ पासून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना फी परत मिळाली नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाइन बैठकीत क्लास बंद होणार याची माहिती दिली होती. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात फिटजी क्लासेसच्या संचालकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यामध्ये तब्बल ३१ विद्यार्थ्यांची ४५ लाख २३ हजार ४५४ रुपयांना फसवणूक केल्याचे तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी बरकत कादरी (वय ४८) यांनी स्वारगेट पोलिसांत तक्रार दिली. यावरून फिटजी या खासगी संस्थेचा व्यवस्थापक संचालक दिनेशकुमार गोयल, मनीष आनंद, राजीव बब्बर तसेच राजेशकुमार कर्ण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आळा आहे.

PUNE FIITJEE Centre
Nilesh Chavan Arrested: ३ राज्यातून प्रवास, अखेर १० दिवसानंतर नेपाळमध्ये बेड्या, निलेश चव्हाणला आज कोर्टात हजर करणार

मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २१ जून २०२४ ते २९ मे २०२५ या दरम्यान घडला आहे. पुण्यातील स्वारगेट भागात असणाऱ्या वेगा सेंटर या इमारतीतील फिटजी या कंपनीचे क्लासेस सुरू होते. विद्यार्थ्यांकडून या खाजगी संस्थेने हजारो रुपये फी च्या स्वरूपात घेतले होते. पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलिसांकडून याबाबत कारवाई सुरू आहे.

PUNE FIITJEE Centre
Crime : आईसोबत अनैतिक संबंध, मित्रानेच मित्राचा काटा काढला, मृतदेह शेतात पुरला, सोलापुरातील धक्कादायक घटना

दरम्यान, तक्रारदार यांनी या संस्थेत त्यांच्या मुलाचा प्रवेश सुरुवातीला २८ हजार ८०० रुपये भरून होता. त्यांनी एकूण ७५ हजार ३०० रुपये भरले होते. मात्र, अचानकच राजेशकुमार कर्म याने पालकांची ऑनलाइन मीटिंग बोलावली आणि क्लास बंद झाला असल्याचे जाहीर केलं. पालकांनी भरलेल्या फी बाबत वारंवार मेलद्वारे विचारणाकरून सुद्धा अनेकांचे पैसे अजूनही परत मिळाले नसल्याचे समोर आलं आहे. एकूण ३१ पालकांची ४५ लाख २३ हजार रुपयांना फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

PUNE FIITJEE Centre
Raid : खिडकीतून ₹५०० च्या नोटांचा पाऊस, सरकारी इंजिनिअरच्या घरात कोट्यवधींचं घबाड, VIDEO पाहून डोळे फिरतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com