Nagpur News saam tv
महाराष्ट्र

MLA Ashish Deshmukh : बाईकवर स्टंट करणं भाजप आमदाराला पडलं महागात, पोलिसांनी केली मोठी कारवाई; VIDEO व्हायरल होताच...

Nagpur News : सावनेरचे भाजप आमदार आशिष देशमुख यांनी तिरंगा यात्रेत विना हेल्मेट अग्निशमन दलाची मोटरसायकल चालवत स्टंट केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दंड ठोठावला.

Alisha Khedekar

  • तिरंगा यात्रेत आमदार आशिष देशमुख यांनी विना हेल्मेट स्टंट केला.

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून नाराजी व्यक्त.

  • सावनेर पोलिसांनी ₹२,००० दंड ठोठावला.

  • लोकप्रतिनिधींनी आदर्श घालून वाहतूक नियमांचे पालन करावे, असा तज्ज्ञांचा सल्ला.

नागपूरमधील सावनेरचे भाजप आमदार आशिष देशमुख हे तिरंगा यात्रेदरम्यान एका अनपेक्षित कारणामुळे चर्चेत आले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त काढण्यात आलेल्या या यात्रेत देशमुख यांनी अतिउत्साहात अग्निशमन दलाची मोटरसायकल विना हेल्मेट चालवली आणि त्यावर स्टंटसदृश प्रकार केला. हा प्रसंग पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा गडगडाट केला, मात्र या कृतीचे वेगळेच परिणाम नंतर उमटले. या प्रकरणी आमदार देशमुख यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

नेमकं काय घडलं?

तिरंगा यात्रेदरम्यान अनेक जण मोबाईलवर चित्रीकरण करत होते. त्यापैकी एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये देशमुख विना हेल्मेट अग्निशमन दलाच्या मोटरसायकलवर बसून रस्त्यावरून वेगाने जाताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे या यात्रेत आमदार आशिष देशमुख यांच्या मागे पोलीस अधिकारी बसलेला दिसत आहे. या व्हिडिओनंतर अनेक नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली. विशेषतः सोशल मीडियावर, लोकप्रतिनिधींनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आणि अशा कृतीमुळे चुकीचा संदेश जात असल्याचे टिप्पण्या करण्यात आल्या.

काय कारवाई करण्यात आली ?

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सावनेर पोलिसांनी तत्परतेने या घटनेची दखल घेतली. मोटर वाहन कायद्यानुसार हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे आणि अधिकृत वाहनाचा अशाप्रकारे वापर करणे या दोन्ही गोष्टींवर कारवाई होऊ शकते. यानुसार पोलिसांनी आमदार देशमुख यांच्यावर दंडात्मक कारवाई करत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

पोलिसांनी स्पष्ट केले की, कोणत्याही व्यक्तीने, मग ती लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य नागरिक, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर समान कायदेशीर कारवाई करण्यात येते. ही कारवाई केवळ नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठीच नव्हे तर लोकांमध्ये वाहतूक सुरक्षेचे भान निर्माण करण्यासाठी आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

या घटनेमुळे एकीकडे आमदारांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर दुसरीकडे वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सार्वजनिक पदावरील व्यक्तींनी स्वतः आदर्श ठेवत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, कारण त्यांच्या कृती समाजासाठी संदेशवाहक ठरतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update: २६ ऑक्टोबरपासून नाशिक-दिल्ली आणि हैदराबाद मार्गावर प्रत्येकी २ फ्लाइट

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

Asia Cup 2025 Final: भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनल,आशिया कप स्पर्धेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT