Nagpur DCC Bank Scam Saam tv
महाराष्ट्र

Nagpur DCC Bank Scam: नागपूर जिल्हा बँक घोटाळा; खात्यांतर्गत चौकशीला सरकारकडून सहा महिन्यांची मुदतवाढ

Nagpur News : प्रकरणाचा खटला सुरु असून अखेर सरकारकडून मागील पाच वर्षापासून सुरू असलेल्या खात्यांतर्गत चौकशीला आणखी मुदतवाढ देण्यात आली

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर सहकारी मध्यवर्ती जिल्हा बँकेत झालेल्या अपहार झाल्याची तक्रार होती. या संपूर्ण प्रकरणाच्या (Nagpur) चौकशीला आता ५ वर्षे ३ महिन्यांचा कालावधी झाला आहे. आता संबंधित प्रकरणात उलट (Scam) तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. ही मुदत ५ मे २०२४ पर्यंत वाढविली आहे. (Tajya Batmya)

राज्याचे माजी पशू संवर्धन व दुग्ध विकासमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार १९९९ साली नागपूर जिल्हा बँकचे (Bank) अध्यक्ष होते. बँकेच्या रकमेतून २००१-०२ या वर्षी होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स .लि. आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाचा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही रक्कम गुंतवण्यात (Bank Scam) आल्याचे आरोप होते. जवळपास १५२ कोटींचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल विभागीय सहनिबंधक नागपूर यांच्या मार्फत १६ जून ला देण्यात आला. मात्र त्याची फेरचौकशी करण्याचे आदेश तत्कालीन सरकारने दिले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सहा महिन्याची मुदतवाढ 

या प्रकरणाचा खटला सुरु असून अखेर सरकारकडून मागील पाच वर्षापासून सुरू असलेल्या खात्यांतर्गत चौकशीला आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकरणी ६ नोव्हेंबर २०२३ ते ५ मे २०२४ अशी सहा महिन्यांसाठी बँकेच्या अंतर्गत समितीला चौकशी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT