Nagpur Friendship day Party Saam Tv News
महाराष्ट्र

'मी थेट बावनकुळेंशी बोलेन'; फ्रेंडशीप पार्टीत २ गटात राडा, आयोजकानं पोलिसांना धमकावलं

Party Turns Political: नागपूरमध्ये फ्रेंडशिप डे पार्टीत दोन गटांमध्ये वाद, पोलिस घटनास्थळी. आयोजकाने पोलिस अधिकाऱ्याला “मी थेट बावनकुळे यांना फोन करतो” अशी धमकी दिली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांनी तपास सुरू केला

Bhagyashree Kamble

  • नागपूरमध्ये फ्रेंडशिप डे पार्टीत दोन गटांमध्ये वाद, पोलिस घटनास्थळी

  • आयोजकाने पोलिस अधिकाऱ्याला “मी थेट बावनकुळे यांना फोन करतो” अशी धमकी दिली

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांनी तपास सुरू.

  • बावनकुळे यांची प्रतिक्रिया, “आयोजक माझ्या परिचयात नाही, नावाचा गैरवापर केला”

पराग ढोबळे, साम टिव्ही

नागपूरमधील कामठी रोडवरील एडन ग्रीन्स रिसॉर्टमध्ये जोरदार राडा झाला. फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं फ्रेंड्स अँड बियॉंड पार्टीमध्ये दोन गटांत बाचाबाची झाली. वादानंतर जुनी कामठी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परिस्थिती निवळण्याऐवजी आयोजकाच्या उद्धट वर्तणुकीमुळे प्रकरण अधिक चिघळले. त्यानं थेट 'मी थेट बावनकुळेंशी बोलेन', असं म्हणत पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली.

हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आयोजक एका पोलिस अधिकाऱ्याला उघडपणे धमकावताना दिसतो आहे. आयोजक 'मी थेट बावनकुळेंशी बोलेन' असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. धमकी दिल्यानंतर पोलिसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

'आम्ही पोहोचलो तेव्हा दोन गटात वाद सुरू होता. म्युझिक बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी तडजोड झाल्याने एफआयआर नोंदवला नाही'; असे जुनी कामठी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी सांगितले. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, घटनेदरम्यान, आयोजकाने सरळ पालकमंत्र्यांचे नाव घेऊन राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी व्हायरल व्हिडिओचा तपास सुरु असल्याचे सांगितले. आयोजकाला लवकरच चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'ते माझ्या परिचयाचे नसून माझ्या नावाची बदनामी करत आहेत', असे ते म्हणाले. तसेच या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी, अशा सुचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

Horoscope Wednesday : 5 राशींना पावणार महादेव, काहींची अर्धवट कामे होतील पुर्ण, वाचा राशीभविष्य

Navi Mumbai : मराठी माणसांमुळे आमचं दुकान चालत नाही; नवी मुंबईत पुन्हा परप्रांतीय दुकानदाराची मुजोरी, VIDEO

Maharashtra Politics: मित्रपक्षांमधील इमकमिंगने शिंदे अस्वस्थ, दिल्लीच्या वर्तुळात 'कुछ बडा होने वाला है'

SCROLL FOR NEXT