Pune : आंतरजातीय लग्नाला विरोध; जावईला मारहाण अन् लेकीचं अपहरण, आई आणि २ मुलांनी नेमका कसा रचला प्लॅन

Inter-caste Marriage: आंतरजातीय विवाहामुळे पतीवर हल्ला आणि पत्नीचं अपहरण. आरोपी आई व दोन भावांना पोलिसांनी अटक केली. एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल.
Intercaste marriage
Intercaste marriageSaam Tv News
Published On
Summary
  • आंतरजातीय विवाहामुळे पतीवर हल्ला आणि पत्नीचं अपहरण

  • आरोपी आई व दोन भावांना पोलिसांनी अटक केली

  • एकूण १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

  • पीडितेची सुटका करून ती पतीकडे सोपवण्यात आली

रोहिदास गाडगे, साम टिव्ही

पुण्यातील राजगुरूनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंतरजातीय विवाहाला विरोध करत जावयाला मारहाण आणि लेकीचं अपहरण करणाऱ्या आईसह २ भावांना अटक करण्यात आली आहे. तसेच या संबंधित प्रकरणात सहभाग घेतलेल्या १५ जणांवर राजगुरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

प्राजकत्ता असं आरोपी आईच्या लेकीचं नाव आहे. तिचा विवाह विश्वानाथ गोसावी यांच्यासोबत झाला होता. त्यांचा प्रेमविवाह होता. मात्र, वयातील फरक आणि जातभेदामुळे नातेवाईकांनी या लग्नाला विरोध केला. पण तरीही नातेवाईकांच्या विरोधाला झुगारात दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली.

Intercaste marriage
क्षुल्लक कारणावरून २ टोळ्यांमध्ये वाद; हाणामारी अन् हवेत गोळीबार, पुण्यात नक्की चाललंय तरी काय?

याची माहिती प्राजक्ताच्या कुटुंबाला कळताच त्यांना राग अनावर झाला. प्राजक्ताची आई आणि २ भावांनी मिळून जावई विश्वानाथ गोसावी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला. रचलेल्या प्लॅनिंगप्रमाणे जावईला मारहाण करण्यात आली. नंतर प्राजक्ताला जबरदस्तीनं घेऊन जाण्यात आले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तत्काळ कारवाई करत मुलीची सुटका केली. तसेच तिला पती (विश्वानाथ गोसावी) यांच्याकडे सोपवण्यात आले. तसेच तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी करत प्राजक्ताची आई आणि तिच्या २ भावांना अटक केली आहे. तसेच या कटात सहभागी झालेल्या १५ जणांविरोधात राजगुरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोघा भावांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपी आई पोलीसांच्या ताब्यात आहे.

Intercaste marriage
माझ्या बायकोशी अनैतिक संबंध, तुमची चॅटिंग व्हायरल करेल; IT कंपनी मालकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com