
केरळमधील एर्नाकुलममध्ये मोठं हनीट्रॅप आणि खंडणी प्रकरण उघड
IT कंपनीच्या मालकाला जाळ्यात ओढून ३० कोटींची मागणी
श्वेता बाबू आणि कृष्णा राज या जोडप्याची पोलिसांकडून अटक
आरोपींनी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी हा कट रचला होता
न्यायालयाने आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला, तपास सुरू
केरळातील एर्नाकुलममधून हनीट्रॅप आणि खंडणीसंबंधित प्रकरण समोर आलं आहे. आयटी कंपनीच्या मालकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी हे कृत्य बंद पडलेलं हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी केलं होतं. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी कपलला अटक करून न्यायालयात हजर केलं. कोर्टानं जोडप्याला सशर्त जामीन मंजूर केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
नक्की प्रकरण काय?
श्वेता बाबू आणि कृष्णा राज असं कपलचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वी आरोपी कपलनं आयटी कंपनीच्या मालकाला जाळ्यात ओढण्यासाठी प्लॅन रचला. त्यांना आयटी मालकाकडून पैसे उकळायचे होते. या पैशातून त्यांना बंद पडलेलं हॉटेल व्यावसाय पुन्हा सुरू करायचा होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्वेता बाबू आयटी कंपनीत १८ महिने काम करीत होती. याच काळात तिनं पतीच्या मदतीनं हनीट्रॅपचा प्लॅन रचला. श्वेतानं आयटी मालकासोबत चॅट्स केले. त्यानंतर कृष्णानं ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. 'तुझे श्वेतासोबत अनैतिक संबंध आहेत. तुमच्या दोघांचे खासगी चॅट्स व्हायरल करू का? तुमची प्रतिमा मलिन करू का? तुझ्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करू', अशी धमकी त्यांनी आयटी मालकाला दिली होती.
धमकी दिल्यानंतर त्यांनी ३० कोटी रूपयांची मागणी केली. यासाठी तिघा कर्मचाऱ्यांना कपलनं परिसरातील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतलं. यावेळी कृष्णा राजच्या अकाऊंटमध्ये त्वरीत १० कोटी रूपये त्वरीत जमा करण्यास सांगितले. उर्वरित २० कोटी त्यांनी चेकद्वारे मागणी केली. दुसऱ्या दिवशी त्यांनी चेक घेतले. तसेच आयटी मालकाकडून ५० हजार घेतले.
घडलेल्या प्रकारानंतर आयटी मालकानं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार, तात्काळ कारवाई करत दोघांनाही अटक केली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.