मुलासमोरच पत्नीनं पोलीस कॉन्स्टेबलला संपवलं, स्वत:ही आयुष्याचा दोर कापला; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती उघड

Constable Mukesh Parmar Killed by Wife: अहमदाबादमध्ये पत्नीने पती, पोलीस हवालदाराची हत्या करून आत्महत्या केली. मुलासमोर काठीने मारहाण करत पतीला ठार मारण्यात आले. सुसाईड नोटमध्ये आर्थिक अडचणींचा उल्लेख.
Constable Mukesh Parmar Killed by Wife
Constable Mukesh Parmar Killed by WifeSaam Tv News
Published On
Summary
  • अहमदाबादमध्ये पत्नीने पती, पोलीस हवालदाराची हत्या करून आत्महत्या केली

  • मुलासमोर काठीने मारहाण करत पतीला ठार मारण्यात आले

  • सुसाईड नोटमध्ये आर्थिक अडचणींचा उल्लेख

  • पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरात भीतीचं वातावरण

गुजरातमधील अहमदाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घरगुती वादातून पत्नीनं मुलासमोर पोलीस हवालदाराची हत्या केली आहे. काठीनं मारहाण करून त्यांना संपवलं. नंतर स्वत: आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. यात घरगुती भांडणाच्या रागातून हा प्रकार घडला असल्याचं नमूद करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मुकेश परमार असे पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तर, संगीत असे पत्नीचे नाव आहे. मुकेश परमार हे अहमदाबाद शहरातील दानीलीमडा पोलीस लाइनमध्ये कॉन्स्टेबल पदावर होते. ते ए डिव्हीजन ट्रॅफिक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, मुकेश परमार आणि त्यांची पत्नी संगीता यांच्यात बऱ्यात काळापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते.

Constable Mukesh Parmar Killed by Wife
क्षुल्लक कारणावरून २ टोळ्यांमध्ये वाद; हाणामारी अन् हवेत गोळीबार, पुण्यात नक्की चाललंय तरी काय?

डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी या जोडप्यामध्ये भांडण झाले होते. या भांडणावेळी त्यांचा मुलगाही तेथे उपस्थित होते. संगीताने रागाच्या भरात मुकेशच्या डोक्यात काठी मारली. तसेच काठीनं मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर संगीतानं गळफास घेत आयुष्य संपवलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. तपासात पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये भांडणाचं कारण आर्थिक समस्या असल्याचं नमूद केलं आहे.

Constable Mukesh Parmar Killed by Wife
Pune : आंतरजातीय लग्नाला विरोध; जावईला मारहाण अन् लेकीचं अपहरण, आई आणि २ मुलांनी नेमका कसा रचला प्लॅन

घटनेच्या दिवशी नेमकं घडलं काय?

द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास जोडप्यामध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला. नंतर दोघांचा मृत्यू झाला. घरात उपस्थित असलेल्या मुलानं शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केलं. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com