Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Nagpur : नागपुरात फिरतेय सोनसाखळी चोरणारी टोळी; काही तासातच दोन महिलांना लुटले

Nagpur News : भर रस्त्यात ज्येष्ठ महिलांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे नागपूरातील रस्त्यांवर चोर बिनधास्त फिरत आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे. एकामागून एक घडलेल्या घटनेमुळे नागपुरात खळबळ

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : शहरातील रहिवासी वस्तीच्या परिसरात जाऊन रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना लुटणारी टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. कारण नागपुरात अवघ्या काही तासात दोन ज्येष्ठ महिलांसोबत सोनसाखळी चोरल्याच्या घटना घडल्या आहे. धक्कादायक म्हणजे दोन्ही ठिकाणी चोरट्यांच्या एकाच टोळीने महिलांची सोनसाखळी हिसकावली आहे. एका ठिकाणी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे.

रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांवर नजर ठेवत दुचाकीवर येत गळ्यातील सोनसाखळी तोडून चोरटे पसार होत आहेत. अशा पद्धतीने चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असून भर रस्त्यात ज्येष्ठ महिलांसोबत घडलेल्या या प्रकारामुळे नागपूरातील रस्त्यांवर चोर बिनधास्त फिरत आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे. एकामागून एक घडलेल्या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. 

भाजी घेऊन जाणाऱ्या महिलेला गाठले 
दरम्यान नागपूरमध्ये घातलेल्या पहिल्या घटनेत सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आझाद चौक येथे सकाळी नऊ वाजता घडली. यात ६०  वर्षीय महिला बाजारातून भाजी घेऊन पायी घराकडे निघाली होती. याच वेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांची गळ्यातली १ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. हि घटना परिसरात लावलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

काही तासात घडली दुसरी घटना 
तर दुसरी घटना काही तासांच्या अंतराने म्हणजे सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत समर्थ नगर भागात घडली. या घटनेत ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातली सव्वा तोळ्यांची सोन्याची चेन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेली. दरम्यान या दोन्ही घटनेतील साखळी चोर एकच असल्याचे समोर आले आहे. मात्र या चोरट्यांचा कुठलाही सुगावा पोलिसांना लागलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Bajar Samiti : अमरावती बाजार समितीचा पुढाकार; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस पाच लाखांचा धनादेश

Maharashtra Live News Update: गोकुळ दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ

Maharashtra Politics : 'मी पक्ष बदलला म्हणून..', प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

Most Expensive Mithai: जगातील सर्वात महागडी मिठाई! किंमत १,११,००० रुपये; कुठे मिळते?

Diwali 2025: दिवाळीला फक्त भाजणीच्या चकल्या कशाला? हे टेस्टी पर्याय नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT