Beed Crime : धक्कादायक! दागिन्यांसाठी वृद्धेचा कान तोडला; बीडच्या लाडेवडगाव शिवारात धाडसी दरोडा

Beed News : लाडेवडगाव शिवारातील अडीच एकर शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहत होत्या. दरम्यान १७ जूनच्या रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास चार ते पाच जण आले होते. त्यांनी दरोडा टाकला आहे
Beed Crime
Beed CrimeSaam tv
Published On

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान केज तालुक्यातील लाडेवडगाव शिवारात वयोवृद्ध महिलेचा कान तोडून सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. यात वृद्ध महिलेचा कान फाटून गंभीर इजा झाली आहे. वयोवृद्ध दांपत्याच्या शेतातील शेडमध्ये घुसून चौघा चोरट्यांनी तब्बल ७३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेले आहेत. 

बीडच्या केज तालुक्यातील लाडेवडगाव शिवारात सदरची घटना घडली आहे. याप्रकरणी समाबाई तुकाराम लाड (वय ८०) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार मागील दोन दिवसांपासून पतीसोबत लाडेवडगाव शिवारातील अडीच एकर शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहत होत्या. दरम्यान १७ जूनच्या रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास चार ते पाच जण आले होते. त्यांनी दरोडा टाकला आहे. 

Beed Crime
KDMC Hospital : केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा बेजाबदारपणा पुन्हा उघड; मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस

दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश 

रात्री शेडबाहेर झोपलेल्या त्यांच्या पतीला काही अनोळखी व्यक्तीने शिवीगाळ करत झोपेतून उठवले. यावेळी आवाज ऐकून समाबाई यांनी आतून आवाज दिला असता एकाने दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. समाबाईनी माझा मुलगा मिल्ट्रीत आहे, त्याला फोन लावते असे म्हणाल्या. मात्र त्या चोरट्याने त्यांचा मोबाईल हिसकावून घेत तुमच्यासोबतच्या दोन लहान मुली कुठे आहेत? असे विचारले. त्यावर घाबरलेल्या समाबाई यांनी ते दोघेच तिथे राहत असल्याचे सांगितले.

Beed Crime
Shahapur Heavy Rain : रात्रभर मुसळधार पावसाने कानवे नदीला पूर; चरिव गावातील मंदिर पाण्याखाली, नंदुरबार जिल्ह्यातही जोरदार पाऊस 

महिलेच्या अंगावरील सर्व दागिने घेऊन पसार 
चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र, नाकातील ३ ग्रॅमची नथ आणि कानातील ४ ग्रॅमचे फुले, एक साधा मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. दरम्यान एक कानातील फुल निघत नसल्याने जबरदस्ती तोडले. यात समाबाई यांचा कान फाटून गंभीर जखम झाली आहे. त्यानंतर चारही चोरटे लोखंडी गेटवरून उड्या मारत अंबाजोगाईच्या दिशेने पायी निघून गेले. सर्वांनी चेहऱ्यावर कपडे बांधलेले असल्याने ओळख पटली नाही. या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com