Nagpur News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : शेतीच्या वादातून भयानक कृत्य; आधी कारने उडविले, नंतर तलवारीने जीवघेणा हल्ला

Nagpur News : दोघांमध्ये शेतातील पाणी अडवण्यावरून साधारण एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. हे वाद तेथेच मिटला होता. मात्र याचा राग लालू भोयर याच्या मनात होता यातून बदला घेण्याच्या इराद्याने जीवघेणा हल्ला केला

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर : साधारण महिनाभरापूर्वी शेतीवरून वाद झाला होता. या झालेल्या वादाचा राग मनात धरून दुचाकीने जात असलेल्या इसमाला कारने धडक देत उडविले. इतक्यावर न थांबता खाली पडलेल्या इसमावर तलवारीने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या पारशवीनीत घडली आहे. यात सदर इसम गंभीर जखमी झाला आहे. 

नागपूर जिल्ह्यातील पारशीवनीच्या ग्रामीण रुग्णालय जवळ सदरची घटना घडली आहे. या घटनेत लालू आसाराम एकनाथ (वय ४६) असे जखमीचे नाव आहे. तर लालू राणु भोयर (वय ३५) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान लालू एकनाथ आणि लालू भोयर या दोघांमध्ये शेतातील पाणी अडवण्यावरून साधारण एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. हे वाद तेथेच मिटला होता. मात्र या वादाचा राग लालू भोयर याच्या मनात होता.  

दुचाकीला धडक देत जीवघेणा हल्ला 

अशातच मंगळवारी लालू एकनाथ हा आपल्या दुचाकी पारशिवनी ते सावनेर मार्गाने आपल्या घरी जात होता. याच वेळी लालू भोयर ह्याने कारने मागून लालू एकनाथ यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार लालू एकनाथ खाली पडला. त्यानंतर लालू भोयरने गाडीतुन तलवारी काढत दुचाकीवरून खाली पडलेल्या लालु एकनाथ याच्यावर  सपासप वार केले.

हल्लेखोरास घेतले ताब्यात 
दुचाकीवरून पडल्याने आणि तलवारीने केलेल्या हल्ल्यात लालू एकनाथ गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पारशिवनी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमीस नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविले. तसेच पारशीवनी पोलिसांनी आरोपी लालू भोयरला अटक केली असून तलवार आणि गाडी जप्त करत पुढील तपास सुरू केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

Tilache Ladoo : हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा रेसिपी

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

SCROLL FOR NEXT