Nagpur : खेळत असताना खड्ड्याने घेतला चिमुकल्याचा जीव; पाण्यात बुडून मृत्यू

Nagpur News : काटोल नगरपरिषदेच्या कडून कचरा डम्पिंग साइटवर जेसीबीच्या सहाय्याने मोठे खड्डे खोदण्यात आले असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे
Nagpur News
Nagpur NewsSaam tv
Published On

पराग ढोबळे 
नागपूर
: सकाळी घराबाहेर पाडल्यानंतर खेळत असताना खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये चिमुकला पडला. खड्ड्यात पाणी साचलेले असल्याने यात बुडून या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बेड्यावर घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून सदर मुलगा मुकबधीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बेड्यावर वास्तव्यात असलेला विराट राणा (वय १२) असे घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान काटोल नगरपरिषदेच्या कडून कचरा डम्पिंग साइटवर जेसीबीच्या सहाय्याने मोठे खड्डे खोदण्यात आले असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असून या साचलेल्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.

Nagpur News
Bhamragad Flood : भामरागडात पूरस्थिती; छत्तीसगढमध्ये मुसळधार पावसाचा परिणाम, शंभर गावांचा संपर्क तुटला

खेळण्यासाठी गेला तो आलाच नाही 
विराट हा सकाळी आईला सांगून घराबाहेर खेळण्यासाठी निघाला. खेळत असताना पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला. यात त्याला बाहेर निघता न आल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती कळाल्यानंतर विराटची आई माधुरी राणा पवार यांना मोठा धक्का बसला आहे. विराटचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या आईने हंबरडा फोडला. 

Nagpur News
Shirdi : हॉटेल्सवर सुरु होता वेश्या व्यवसाय; शिर्डीतील चार हॉटेल एक वर्षासाठी सील

सखोल चौकशीची मागणी 

दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपास सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आदिवासी पारधी समाजाकडून करण्यात आली आहे.  दरम्यान या भागात पारधी समाज बांधव राहत आहे. मागील अनेक वर्षांपासून या खड्ड्यांना बुजवण्याची आणि डम्पिंग साइट इतरत्र हलवण्याची मागणी केली जात आहे. तर हे खड्डे का करण्यात आले. यासाठी कोण जवाबदार आहे, मागणी करून सुद्धा खड्डे बुजवले नाही; या सगळ्याची चौकशी करून कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com