Bhamragad Flood : भामरागडात पूरस्थिती; छत्तीसगढमध्ये मुसळधार पावसाचा परिणाम, शंभर गावांचा संपर्क तुटला

Gadchiroli News : छत्तीसगड राज्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वच नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. इंद्रावती नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली
Bhamragad Flood
Bhamragad FloodSaam tv
Published On

गणेश शिंगाडे 
गडचिरोली
: छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुलगौतम या तिन्ही नद्यांच्या पाणी पातळीत २६ ऑगस्टला अचानक वाढली आहे. यामुळे भामरागड तालुक्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील साधारण १०० गावांचा संपर्क तुटला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे संकट ओढवले आहे. 

गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी भामरागड पर्लकोटा नदीला पूर आल्यामुळे शंभर गावाचा गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. काल रात्रीच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आणि अचानक पाणी वाढल्याने भामरागड तालुका मुख्यालयात पाणी शिरले. मध्यरात्री अचानक पाणी वाढल्याने व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. प्रशासनाने सर्वांना सतर्क करत तालुका मुख्यालयातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे

Bhamragad Flood
Jalgaon News : भाजप नेत्यावर कोयत्याने हल्ला, जळगावमध्ये खळबळ

गर्भवती महिलेचे रेस्क्यू 

भामरागड तालुक्यातील पामुलगौतम नदीपलीकडील हिंदेवाडा येथील एका गर्भवती महिलेला अचानक प्रसुती वेदना सुरु झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र परलकोटासह पामुलगौतम नदी देखील तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे झाले होते. दरम्यान आज पहाटे चार वाजताच्या सुमारास एसडीआरएफ टीमच्या मदतीने बोटीद्वारे पामुल गौतम नदीतून रेस्क्यू करत त्या गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. अर्चना विकास तिम्मा असे गर्भवती महिलेचे नाव असून सध्या तिला भामरागड तालुका मुख्यालयातील ग्रामीण रुग्णालयात प्रसुती करिता दाखल करण्यात आले आहे.

Bhamragad Flood
Shirdi : हॉटेल्सवर सुरु होता वेश्या व्यवसाय; शिर्डीतील चार हॉटेल एक वर्षासाठी सील

पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली 
हवामान खात्याने २६ आणि २७ ऑगस्टला छत्तीसगड राज्यात रेड अलर्ट घोषित केले आहे. त्यानुसार २६ ऑगस्टला छत्तीसगड राज्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वच नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. इंद्रावती नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून तालुका मुख्यालयातील पामुलगौतम आणि पर्लकोटा नदी देखील तुडुंब भरून वाहत आहे. यापूर्वी देखील तीनदा भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. अहेरी ते भामरागड रस्त्यावरील रहदारी बंद झाली होती. आता पुन्हा रात्रीच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com