Shirdi : हॉटेल्सवर सुरु होता वेश्या व्यवसाय; शिर्डीतील चार हॉटेल एक वर्षासाठी सील

Shirdi News : हॉटेल्सवर पिटा अंतर्गत कारवाई केली होती. त्या कारवाई नंतर पोलिस प्रशासनाने न्यायालयात अहवाल सादर केला होता. या अहवालावरून न्यायालयाने निकाल देत ज्या ठिकाणी वेशाव्यवसाय सुरू होता
Shirdi News
Shirdi NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहिल्यानगर) : हॉटेल्सवर देहविक्रीचा अवैध व्यवसाय चालविला जात असल्याचे समोर आले आहे. शिर्डीत देखील काही दिवसांपूर्वी हा प्रकार समोर आला होता. त्यानुसार शिर्डी शहरात वेश्या व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरातील चार हॉटेल्स एक वर्षासाठी सील करण्यात आले आहे. 

शिर्डीमध्ये काही दिवसांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी हॉटेल्सवर पिटा अंतर्गत कारवाई केली होती. त्या कारवाई नंतर पोलिस प्रशासनाने न्यायालयात अहवाल सादर केला होता. या अहवालावरून न्यायालयाने निकाल देत ज्या ठिकाणी वेशाव्यवसाय सुरू होता. त्या आस्थापना सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी याबाबत आदेश काढले आहेत. 

Shirdi News
Ratnagiri Crime : वडिलांनी घेतलेल्या कर्जातून त्रस्त मुलाने जन्मदात्या आईचा घेतला जीव; रक्ताच्या थारोळ्यात आईला पाहून आत्महत्येचा प्रयत्न

वर्षभरासाठी हॉटेल्स सील 

दरम्यान ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आढळून आले होते. त्यांना सील लावण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार शिर्डी शहरातील हॉटेल साई वसंत विहार, हॉटेल शिर्डी साई इन, हॉटेल साई वीरभद्र आणि हॉटेल साई शीतल या हॉटेलवर कारवाई करत सदरचे हॉटेल्स एक वर्षासाठी सील करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. 

Shirdi News
Dharashiv : स्मशानभूमी जागेच्या वादातून दोन गटात तुफान राडा; पोलीस गाड्यांवरही दगडफेक, दहा जण जखमी

अवैध धंद्याला लागणार चाप 

शिर्डी शहरात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध धंदा चालविला जात असल्याचे झालेल्या कारवाईमुळे उघडकीस आले आहे. यात चार हॉटेल्सवर कारवाई झाल्यामुळे खळबळ उडाली असून हॉटेल्स सील करण्यात आलेल्या कारवाईमुळे किमान हॉटेल्सवर चालविले जाणारे अवैध धंद्यांना काही दिवस तरी चाप बसणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com