Nagpur Corona Saam tv
महाराष्ट्र

Nagpur: नागपुरमध्ये कोरोनाने चिंता वाढवली, आणखी दोघांचा मृत्यू; मृतांचा आकडा ७ वर

Nagpur Corona: नागपूरमध्ये कोरोनाने टेन्शन वाढले आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

Priya More

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू देखील होताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मुंबई, ठाणेपाठोपाठ आता नागपूरमध्ये कोरोनाने टेन्शन वाढवले आहे. आणखी दोन कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे. नागपुरात एका ६४ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. तर कोरोनामुळे मृत्यू झालेला दुसरा रुग्ण भंडारा जिल्ह्यातील असून त्याचे वय ५९ वर्षे होते. तर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि संभाजीनगर या ठिकाणी आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

नागपूर शहरातील विविध रुग्णालयामध्ये आतापर्यंत ६० पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २० जण सक्रिय आहेत. तर बहुतांश कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. पाच रुग्णांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे कोरोनाची तपासणी आणि उपचाराची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरून न जाता वेळीच योग्य उपचार करा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: सतर्क रहा! राज्यात पुढील ५ दिवस धो-धो पावसाचे; ४ जिल्ह्यात रेड अलर्ट

Maharashtra Live News Update: - हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट

Shikakai Benefits : केस गळती थांबवण्यासाठी आजीबाईंचं जुनं रसायन; वाचा शिकेकाईचे फायदे आणि वापरण्याची योग्य वेळ

Youth Mental Health: डिजिटल डिव्हाईसच्या अतिवापराने तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?

Rahul Gandhi : माझ्याकडून मोठी चूक झाली; राहुल गांधी यांनी भर सभेत मान्य केलं, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT