Nagpur Police : नागपूरात वाढतेय नशेखोरी; ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नागपूर पोलिसांची दीड वर्षातील कारवाई

Nagpur News : पोलिसांनी कारवाई करत तस्करी रोखली. मागील दीड वर्षांपासून ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमेत ७३० जणांना अटक, ५४० प्रकरणांमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक संबंधित गुन्ह्यांची नोंद
Nagpur Police
Nagpur PoliceSaam tv
Published On

पराग ढोबळे 
नागपूर
: उपराजधानी नागपूर ड्रग फ्री करण्यासाठी नागपूर पोलिसानी ऑपरेशन थंडर अंतर्गत कठोर पावले उचलली जात आहे. युवा पिढी व्यसनाधीन होत गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या संकल्पनेतून मागील दीड वर्षात ८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नागपूर शहरात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात गांजा तसेच अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कारवाई करत हि तस्करी रोखली आहे. दरम्यान नागपूर पोलिसांनी मागील दीड वर्षांपासून ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमेत ७३० जणांना अटक करण्यात आली आहे. यात ५४० प्रकरणांमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि साठवणूक संबंधित गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Nagpur Police
Amol Mitkari : मुख्यमंत्री पदावरून आमदार मिटकरींचे मोठं वक्तव्य; आषाढीच्या महापुजेबाबत व्यक्त केली इच्छा

पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ
नागपूर पोलिसानी मागील दीड वर्षात केलेल्या कारवाईत एमडी (मेथॅम्पेटामीन) एकूण ९४ प्रकरणांत एकूण 6 किलो एमडी ज्याची किंमत ६ कोटी ८१ लाख रुपये किमतीची एमडी पावडर जप्त केले आहे. यात १८६ जणांना अटक. तर १०० प्रकरणांत १ कोटी ६६ लाख रुपयांचा गांजा जप्त करून १३२ आरोपींवर अटक केली. नशा करण्यासाठी वापरली जाणारी १२८ किलो डोडा पावडर जप्त केली आहे. तसेच एका प्रकरणात ५४८ ग्रॅम अफीम जप्त ज्याची किमत ६ लाख १८ हजार रुपये असून एक आरोपी अटकेत. १ लाख ७५ हजार रुपयांचा ७० ग्रॅम चरस जप्त केला आहे. 

Nagpur Police
Shahada News : लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, पण पैसे काढण्यासाठी पहावी लागतेय वाट; बँक सर्व्हर तीन दिवसांपासून डाऊन

जनजागृती मोहीम 

नागपूर शहर ड्रग फ्री करण्याच्या उद्देशाने २० ते २६ जूनदरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे. एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया’ या घोषवाक्याखाली शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध खेळांचे खेळाडू यांच्या सहभागातून जनजागृती होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com