Shahada News : लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, पण पैसे काढण्यासाठी पहावी लागतेय वाट; बँक सर्व्हर तीन दिवसांपासून डाऊन

Nandurbar News : नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे इंटरनेट सेवेवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ब्राह्मणपुरी सेंट्रल बँकेचा सर्वर गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे
Shahada News
Shahada NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 
नंदुरबार
: राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये बँक खात्यात टाकले जात आहेत. या महिन्यात देखील योजनेचे पैसे येऊन पडले आहेत. मात्र बँकेतून हे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींना बँकेच्या बाहेर तासनतास बसून रहावे लागत आहे. मागील तीन दिवसांपासून हि समस्या शहादा येथील सेंट्रल बँकेत पाहण्यास मिळत आहे. 

नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील विविध भागात झालेल्या जोरदार पावसामुळे इंटरनेट सेवेवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे ब्राह्मणपुरी येथील सेंट्रल बँकेचा सर्वर गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. परिणामी आर्थिक व्यवहाराला ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींना तासन्तास बँकेबाहेर बसण्याची वेळ आली आहे. खात्यात येऊन पडलेले पैसे हातात कधी पडतील? याची प्रतीक्षा आहे. 

Shahada News
Nashik Heavy Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस; सातपूर परिसरातील अनेक घरांमध्ये शिरले पाणी, त्र्यंबकेश्वरमधील रस्तेही पाण्याखाली

लाखो रुपयांचे व्यवहार रखडले 

शहादा तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून ठीकठिकाणी वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडले आहेत. परिणामी इंटरनेट सेवा देखील विस्कळीत झाली आहे. इंटरनेट सेवेचा परिणाम बँकांच्या व्यवहारावरही होताना दिसत आहेत. अनेक वेळा सेवा खंडित झाल्यामुळे, तर कधी सर्वर डाऊन असल्यामुळे बँकांचा व्यवहार ठप्प झालेला आहे. सध्या बँकेतून पैसे काढणे पासबुक भरून घेणं शक्य होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. सर्व डाऊनच्या फटक्यामुळे लाखो रुपयांचे व्यवहार रखडले आहेत. 

Shahada News
Amol Mitkari : मुख्यमंत्री पदावरून आमदार मिटकरींचे मोठं वक्तव्य; आषाढीच्या महापुजेबाबत व्यक्त केली इच्छा

शेतकरीही अडचणीत व्यावसायिक

शेतकरी, लाडक्या बहिणी त्यासोबतच विद्यार्थ्यांना देखील याचा सामना करावा लागत आहे. सातत्याने होणारा इंटरनेट खंडित आणि बँकेचे सर्वर डाऊनचा फटका लाडकी बहिणी सोबतच शेतकऱ्यांना देखील बसतांना पाहायला मिळत आहे. परिणामी खत घेण्यासाठी देखील पैसे बँकेतून निघत नसल्याने शेतकरी देखील अडचणीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com